मायणी :- ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)
मायणी ता खटाव येथील विविध दैनिकातून सामाजिक जोपासना करून आपली वेगळी ओळख बनवणारे पत्रकार दत्ता कोळी यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे .
जिल्हा उपाध्यक्ष या पदावर आपली नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या ध्येय धोरणाच्या आधीन राहून ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न ,सोडवणूक करण्याबरोबरच आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबुत करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कोळी यांनी सांगितले .
संघटनेचे राज्य संघटक संजयजी भोकरे व राज्याध्यक्ष राजा माने ,राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे ,सातारा जिल्हा अध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल दत्ता कोळी यांचे अभिनंदन केले .