नागपूर - अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात आयोजित नॉर्थ ईस्ट युथ एक्सस्चेंज कार्यक्रमाचे उद्दघाटन प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा कार्यक्रम भारत सरकारच्या गृहमंत्रालय, युवक कल्याण आणि क्रीडा आणि नवी दिल्लीच्या नेहरू युवा केंद्र संगठन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाला आमदार डॉ मिलिंद माने मुख्य अतिथी तर अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेंद्र मोहतुरे यांची विशेष उपस्थिती होती.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि त्रिपुरा या राज्यांमधून 275 तरूण मुले आणि मुली 11 ते 16 फेब्रुवारी 2019 पर्यंत नेहरू युवा केंद्र नागपूरद्वारे आयोजित या सहा दिवसांच्या युवा आदान प्रदान कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत.
या एक्सचेंज प्रोग्रामचे दोन उद्दिष्ट आहेत: उत्तर-पूर्व राज्यातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे आणि स्थानिक युवकांना पूर्वोत्तर राज्यातील समृद्ध संस्कृतीची ओळख करून देणे आणि अशा प्रकारे परस्पर सन्मान आणि आत्मीयता विकसित करणे.
उदघाटनपर कार्यक्रमाची सुरवात त्रिपुराच्या युवकांनी गायलेल्या गाण्याने झाली. श्री शरद साळुंके , जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र यांनी कार्यक्रमाची रूपरेषा दिली. २०१६मध्ये मंत्रालयाने नागपुरात या कर्यक्रमाला सुरवात केली होती आणि नेहरू युवा केंद्राला पुन्हा एकदा याचा मान मिळाला आहे. सहभागी युवकांची चांगली सोय उपलब्ध करून त्यांना मंच प्रदान करण्याकरिता नेहरू युवा केंद्र कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार श्री सोले यांनी आपल्या भाषणात भारताच्या विविधतेबद्दल सांगितले. कुठल्याही देशात वातावरण, पठार, वन्यप्राणी इत्यादिमध्ये इतके वैविध्य नाही. आपल्या संसदेत आपण एक छोट्या स्वरूपातील भारत पाहतो जिथे विविध राज्यांचे लोक आपल्या पोशाखात येतात आणि देशाच्या कल्याण आणि विकासाबाबत चर्चा करतात. भारतात सर्वात मोठी पर्वत रांग हिमालय आणि सर्वात जुनी पर्वत रांग अरावली आहे. प्रत्येक युवकाने ईश्वराचे आभार मानले पाहिजे की आपण एका पवित्र भूमीत जन्माला आलो. आंतर-राज्य संबंध अधिक बळकट करण्यात या कार्यक्रमाची भूमिका महत्वाची असल्याचे ते म्हणाले. त्यांनी गृहमंत्रालय, युवक कल्याण आणि क्रीडा आणि नवी दिल्लीच्या नेहरू युवा केंद्र संगठन यांचे अभिनंदन केले आहे.
आमदार डॉ मिलिंद माने यांनी उत्तर पूर्व देशांच्या लोकांची त्यांच्या प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि देशभक्ती बद्दल प्रशंसा केली. ते म्हणाले की ही राज्ये बांग्लादेश, म्यानमार आणि तिबेटच्या सभोवतालची आहेत आणि तरीही त्यांनी त्यांचे अद्वितीय संस्कृती व मूल्य राखले आहे.जर एखाद्याला खरोखर भारताला समजून घ्यायला आवडत असेल तर त्याने देशाच्या लांबी आणि रुंदी दरम्यान प्रवास करावं आणि समृद्ध संस्कृतीचे जाणून घ्यावी.
आपल्या देशामध्ये प्रवास करण्याचे आमचे मूलभूत अधिकार आहे परंतु दुर्दैवाने काही राज्ये इतर राज्यांमधील लोकांना त्यांचे स्वागत करीत नाहीत. हे आपल्या देशाच्या ऐक्यासाठी हानिकारक आहे.जपानचे नागरिक खरे देशभक्त असल्यानेच ते १९४५च्या बॉम्बस्फोट नंतर प्रगत राष्ट्र घडवू शकले. आपल्या देशाच्या युवकांनी यातून बोध घ्यायला हवा असेही ते म्हणाले.
नेहरू युवा केंद्र भंडारा, युवा समन्वयक, हितेन्द्र वैद्य, यांनी सहभागी युवकांच्या शिस्त आणि सहकार्यांचे कौतुक केले आणि त्यांना सहा दिवसांच्या एक्सचेंज प्रोग्राममधून जितके शक्य तितके शिकण्यास सांगितले. श्री. कपिल आदमणे यांनी त्यांच्या जुन्या एक्सचेंज कार्यक्रमाच्या पूर्वीच्या अनुभवाची आणि मणिपुरच्या त्याच्या भेटीचीही माहिती दिली जेथे त्यांनी त्यांचे आतिथ्य अनुभवले .
डॉ देवेंद्र मोहतुरे यांनी देखील उत्तर पूर्व युवकांच्या अभूतपूर्व सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. त्रिपुरा, सिक्किम आणि नागालँडमधील सहभागींनी देशभक्ती गीतांचे सादरीकरण केले ज्याचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. शिवराय कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे अतिशय प्रभावीपणे सूत्रसंचालन केले तर श्रीमती. ज्योती मोहिते, जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र अमरावती यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राच्या कर्मचारी व स्वयंसेवकांनी कठोर परिश्रम घेतले.