मनोज चिचघरे/भंडारा प्रतिनिधी
पवनी तालुक्यातील मौखारा गावामध्ये माँ सती पातीची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. या यात्रेसाठी खूप दूरवरुन मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. दर ३ वर्षानी ही यात्रा मौखारा या गावामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भंक्तनंसाठी महाप्रसादाचे वितरण केले जात असते. १५०० लोक संख्या असलेले मौखारा या गावाती मा, प्रशांत भुते सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना तालुका उपाध्यक्ष पवनी यांचा या यात्रेसाठी खूप मोठे योगदान असते. भोजराजी भेंडारकर, परिवार व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.