गूगलने गेल्यावर्षी त्यांच्या Google I/O कार्यक्रमात दाखवल्याप्रमाणे आता AR (ऑग्मेंटेड रिअॅलिटी) आधारित मॅप नॅव्हिगेशनचा अनुभव घेता येईल. यामुळे सध्या दिसणाऱ्या 2D मॅप ऐवजी आपण कॅमेरासमोर धरून आपल्याला गेम्समध्ये ज्या प्रमाणे दिशा दिसतात तशाप्रकारे दिशा दिसतील!
यासाठी VPS (Visual Positioning System) चा वापर केला जाईल. ज्यामध्ये GPS शिवाय फोनचा कॅमेरा आणि गूगलचा डेटा यांची सांगड घालून आपल्या भवतालची योग्य माहिती तपासून अचूक लोकेशन दाखवेल! पुलाजवळील रस्त्याने जाताना वरून जावं की बाजूच्या रस्त्याने असे प्रश्न सुटू शकतील. कारण अचूक दिशेने दिसणारा 3D बाण आपल्या मदतीस असेल!
ही सुविधा सर्वांसाठी नेमकी कधी उपलब्ध होईल याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही मात्र वॉल स्ट्रीट जर्नलने याचा डेमो व्हिडिओ बनवला असून खाली पाहू शकाल.
ही सोय वापरण्यासाठी नवं Start AR बटन देण्यात आलं आहे. ज्यावर टॅप केल्या आपला नेहमीचा मॅप खालच्या बाजूस जातो आणि वरती आपल्या कॅमेराला दिसणारं दृश्य दिसू लागतं. मग कॅमेरा दृश्यावर बाण, नाव आणि वळणासंबंधी माहिती देण्यात येईल. यासोबत बॅटरी वाचावी अशा दृष्टीनेसुद्धा काही पर्याय पाहायला मिळतील!
साभार
https://www.marathitech.in/