कृषी मंत्रालय
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019
केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2018-19 साठी महत्वाच्या पिकांच्या उत्पादनाचा दुसरा अगीम अंदाज 28 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर केला. जून ते सप्टेंबर 2018 या मान्सून काळात देशात एकत्रित पाऊसमान दिर्घ कालीन सरासरीच्या 9 टक्के कमी झाले. उत्तर पश्चिम भारत, मध्य भारत आणि दक्षिण भागात एकंदरीत सामान्य पाऊस झाला. तसेच महत्वाची पिके पिकवणाऱ्या बहुतेक राज्यातही सामान्य पाऊस झाला. यामुळे 2018-19 या कृषी वर्षात महत्वाच्या पिकांचे अनुमानित उत्पन्न सामान्य उत्पन्नापेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.
अनुमानित अंदाज –
· अन्नधान्य – 281.37 दशलक्ष टन
· तेलबिया – 31.50 दशलक्ष टन
· कापूस – 30.09 दशलक्ष, गासड्या (170 कि.मी. प्रत्येक)
· ताग आणि इतर – 10.07 दशलक्ष गासड्या
· ऊस – 380.83 दशलक्ष टन