Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

नागपूरातील घरे तोडण्याची कारवाई बंद करा

चंद्रपूर/प्रतिनिधी:

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागपूर जिल्ह्याच्या ७१९ ग्रामपंचायतीतील दोन लाख घरे अनधिकृत असल्याचे घोषित केले असून, ही घरे तोडण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे ही कारवाई बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सभापती शीतल उगले यांच्या वक्तव्यानुसार अनधिकृत घरे तोडण्याची कारवाई होणार आहे. 

या कारवाईबाबत बोलताना प्रशांत पवार म्हणाले, या कारवाईमुळे दोन लाख घरमालकांचे आर्थिक नुकसान होऊन १५ लाख नागरिक बेघर होणार आहेत.गावकऱ्यांना, व्यापाºयांना, कारखानदारांना व भूखंडधारकांना त्रस्त करून त्यांच्याकडून पैसा वसूल करणे हा शासनाचा उद्देश आहे. यात ज्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांनी अनधिकृत बांधकामे केली त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतुद आहे. व्हीसीए स्टेडियमही अनधिकृत असून, या स्टेडियमवर ५ मार्चला होणारा सामना रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

 घरे तोडण्याची कारवाई बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलापत्रकार परिषदेला जय जवान, जय किसान संघटनेचे सचिव अरुण वनकर, विजयकुमार शिंदे, मिलिंद महादेवकर, उत्तम सुळके, शेखर शिरभाते, रवींद्र इटकेलवार उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.