विरुर स्टे/प्रतिनिधी:
येथील शिव भक्त व बजरंग ग्रुप , छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने विरुर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे महाराष्ट्र घडवणारे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त साधून रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटक गुरुद्वारा सिंग सभाचे संचालक मा. सुरेंद्रपाल सिंग बवेजा ,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सरपंचा कु. भाग्यश्री आत्राम, प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष मा. राम अवतार सोनी , प्रमुख मार्गदर्शक पि.एस.आय. वडतकर ठाणेदार विरुर मा.सुरेश पावडे, मा.सतीश कोमरवेल्लीवार, सर्वश्री. भास्कर सिडाम, विलास आक्केवार ,संतोष ढवस, सुधाकर पा. मोरे ,संतोष उपरे, मारोती मित्तरवार, शाम कस्तुरवार पआदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा व इतरही प्रतिमेचे पूजन करून द्वीप प्रज्वलनाने करण्यात आले. पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिक बांधवाना मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले. प्रास्तविकात सचिन फटाले यांनी शिवप्रेमीकाची भूमीका विशद केली.
शासनाकडून मंजूर होऊन आलेला शिवाजी चौकाचे सौदर्यकरण याला त्वरित अमलबजावणी करावी. अशी शिवभक्ताच्या वतीने कळकळीचे आव्हान मा. सरपंचा महोदय यांना दिले. प्रमुख मार्गदर्शक पि. एस.आय. वडतकर साहेब यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकून नवतरुण यांनी शिवाजी महाराज यांच्या विचाराने विचार आत्मसात करून जीवन जगले पाहिजे. रक्तदाना विषयी जन जागृतीचे महत्व पटवून दिले. या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर याच्या चमूने रक्त संकलन केले. तसेच यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रक्तदान कार्ड आणि टी शर्ट वाटप करण्यात आले. एक वर्षाच्या आत रक्तदात्याच्या कार्ड वर एक पिशवी रक्त मोफत मिळेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ठमके, प्रास्ताविक सचिन फटाले तर आभार संकेत गायखी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तुषार मोरे, शुभम गायखी, शंकर झुंगरे, मोरेस्वर कडुकर , स्वप्नील भोसकर, इर्शाद शेख , रोहन पोटे, सूरज भोसकर, हितेश गाडगे, उमेश मोरे,वामन ठमके, प्रीतम राऊत, शिवकुमार जयस्वाल, शब्बीर शेख,विशाल मित्तरवार, योगेश बक्षी आदींनी रक्तदान देऊन सहकार्य केले.