चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील युवकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. चंद्रपूर जिल्हातील कंपण्यांचा मुजोरी पणा याला जबाबदार असून आता ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही असा ईशारा देत हक्काच्या रोजगारासाठी लढा उभारण्यात येत आहे. याची सुरुवात सामाजीक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात 2 मार्च ला धारीवाल कंपणीवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येत असून स्थानीक युवकांना रोजगार द्या या मागणी सह इतर मागण्यांकडे या मोर्चाच्या माध्यमातून कंपणी प्रशासनाचे लक्ष वेदण्यात येणार आहे.
-----------------------Advt ----------------------
फोन पे App डाऊनलोड करण्यासाठी 👇येथे क्लिक
----------------------- ----------------------
या मोर्चात जास्तीत जास्त संख्यने बेरोजगार युवकांनी सहभागी होण्याचे आव्हाहन किशोर जोरगेवार यांनी केले आहे. रोजगार देणारा जिल्हा म्हणून ओखळत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांनाच आता रोजगारासाठी भटकावे लागत आहे. रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील अनेक कुटुंबांनी चंद्रपूरातून पलायन केले आहे. हे एकेकाळी रोजगार निर्मीतीचे केंद्र असलेल्या जिल्हाचे दुर्दैव आहे. ताडाळी येथे असलेल्या धारिवाल कंपनीने स्थानिक नागरिकांना कामावर न घेता बाहेरील लोकांना नौकरीत प्राधान्य देऊन स्थानिकांना बेरोजगार केले आहे. या कंपनीद्वारे दररोज500 ते 600 ट्रकांची अवैध रित्या जड वाहतूक होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या कंपनीच्या प्रदुशनाने स्थानिक परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे दमा, अस्थमा, कर्करोग इत्यादी असाध्य रोगाने येथील नागरिक त्रस्त आहे.
असे असले तरी येथील व्यवस्थापनाणे याकडे पूर्णपणे दुर्लक्षकेले आहे. मात्र आता या अन्याया विरोधात लढा उभारत स्थानिक नागरिकांनाच नौकरी देण्यात यावी,सी.एस.आर. फंडाचे वापर युवकांचे व महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी करण्यात यावे, अवैधरीत्या होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी,प्रदूषन रोखन्याकरीता उपाययोजना करण्यात याव्या, प्रदूशनामुळे होणा-या शेतपिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी. येथे कार्यरत कामगारांना वेतन वाढ देवून सुरक्षा साधने उपलब्ध करुन देण्यात यावी, कंपनीने येथील नागरिकांना निम्य दर्जाची वागणुक देने बंद करावे, कंपणी सुरु होतांना गावक-यांना दिलेल्या आश्वासनांची कंपणी व्यवस्थापणाने पूर्तता करावी, या मागण्यासाठी 2 मार्च ला दूपारी 1 वाजता सामजिक कार्यकर्ते किषोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात धारिवाल कंपनीवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाची सूरूवात गांधी चौक येथून बाईक रॅलीने होणार असून यात बैलबंड्याचाही समावेष राहणार आहे. ही रॅली ताडाळी टी पाईंट जवळ पोहचल्यानंतर रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे. तेथून मुख्य मोर्चाला सूरूवात होणार असून हा मोर्चा थेट धारिवाल कंपनीवर धडकणार असून यावेळी कंपनी व्यवस्थापनाला मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे. तरी या मोर्च्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी केले आहे.