(प्रशांत गेडाम )
सिंदेवाही : - दारूबंदी मोहीम दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) या गावातील तीन ईसमावर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या मुद्देमाल 43,000 /- रुपयांचा मोहा सडवा नष्ट करण्यात आला. हे कारवाई सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये नविन रुजू झालेले. पोलीस निरीक्षक रामटेके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस स्टेशन चे पथकाने केली त्यां तीन ईसमावर
65 (फ) म.दा .का हे कलम लावण्यात आले. तसेच
सिंदेवाही पोलीस स्टेशन ने दारू विक्रेता धनंजय दयाराम साखरे रा.सिंदेवाही याला त्याचेकडील त्याचे दुचाकी वाहन क्र.- MH34 BN-2358 वाहनांची झडती घेतली असता. गाडीचे डीक्कीतून देशी आणि विदेशी दारूचा ७५ ,००० /- रूपये किंमतीचा दारूसाठा व आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. हे कारवाई संपत नसतानाच पुन्हा दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजत सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर (मोहाळी) या गावातील भाऊगौतम तुळशीराम लोणारे वय - ३५ रा.नलेश्वर गुप्त माहितीवरून या व्यक्तीच्या घरी गेले झडती घेतली असता त्याचे घरातून देशी दारूच्या १४ पेट्या जप्त केल्या ज्याची किंमत १ लाख ४० हजार येवढी असून दारूसाठा आणि आरोपी याला अटक करून पोलीस स्टेशन सिंदेवाही ला हलविले त्याच्याकडे विचारणा केली असता दारू कुठून आणली त्या आरोपी व्यक्तीने पटकन आकाश सोनुले रा.शिवनी याचे नाव सांगितले हा दारू पेटी मला आणून देतो हे सांगीतले. असता. सिंदेवाही पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक रामटेके साहेबांनी शिवनी मध्ये जाऊन आकाश सोनुले या व्यक्तीस अटक केले. त्यां आरोपी वर ६५(ई)/८३ मं.दा.का गुन्हा दाखल केला आहे.
सिंदेवाही पोलीस निरीक्षक रामटेके साहेब यांच्या मार्गदर्शनात झालेल्या धडक कारवाई मुळे तालुक्यातील थोडक्यात दारू तस्करांचे व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. नविन ठाणेदारांचे अवैध दारू विक्रेता यांचेवर पडलेल्या धाडीमूळे सिंदेवाही चे पोलीस निरीक्षक रामटेके, जमादार डीएस परचाके , ठोंबरे, लेनगुरे , गणेश मेश्राम , ज्ञानेश्वर डोकळे, दिंडे व त्यांच्या स्टॉप सर्वत्र कौतुक होत आहे. असेच धाडसत्र सुरू ठेऊन सिंदेवाही तालुक्यात दारूबंदी मोहीम यशस्वी करावे. अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे