मायणी /ता.खटाव(सतीश डोंगरे):
पत्रकार दिनाचे औचित्य साधत लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांचा गौरव करत चैतन्य करियर अकँडमीने सामाजीक बांधीलकी जपण्याचे कार्य केले आहे. अकँडमीतून स्पर्धा परिक्षा , पोलीस , आर्मी ,आदी विविध भरतीबाबत युवक - युवतींना मार्गदर्शकाची चोख भूमिका बजावली जात असल्याने गेल्या ९ वर्षात असंख्य विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यश मिळवले असल्याचे प्रतिपादन माण-खटाव चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
दहिवडी ता.माण जि.सातारा येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधत चैतन्य करीयर अकँडमीने पत्रकारांचा गौरव हा कार्यक्रम त्यांच्या वर्धापनदिवशी आयोजित केला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ए.जी.वढनेरे ,सपोनि प्रविण पाटील ,भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ ,नगराध्यक्षा सौ.साधना गुंडगे ,मुख्याधिकारी कपिल जगताप ,पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ ,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षित ,आगारप्रमुख मोनाली पाटील ,नगरसेवक अजित पवार ,चैतन्य अकँडमीचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव खाडे ,सुभाष पवार ,पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चैतन्य अकँडमीतर्फे मान्यवरांच्या हस्ते माण-खटावमधील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.तसेच विविध स्पर्धा ,भरतीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वढनेरे ,सपोनि प्रविण पाटील ,नगराध्यक्ष सौ.साधना गुंडगे , बाळासाहेब मासाळ ,अजित पवार , गणेश वाघ ,प्रमोद दिक्षीत ,कपिल जगताप ,मोनाली पाटील ,धनंजय क्षीरसागर आदींनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन एस.एस.खाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी चोख बजावले.
खाडे सर यांनी सूत्रसंचालन करत आगामी होणाऱ्या 72000 सरकारी नोकर भरती साठी सरळ सेवा भरती साठी चैतन्य करिअर अकॅडमी त प्रवेश मिळवून आपल्या आगामी होणाऱ्या नोकरभरतीचे सोने करावे माण खटाव तालुक्यातील व अॅकॅडमी चे जुने विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये 50 टक्के सवलत देऊन खऱ्या अर्थाने माण खटावमधील तरुणांसाठी ही सुवर्णसंधीच आहे आगामी पोलीस भरती व सरळसेवा भरतीसाठी चैतन्य करिअर अकॅडमी प्रवेश घेऊन या संधीचे सोने करावे खाडे सर यांनी सांगितले.उपस्थितांचे आभार एस खाडे सर यांनी मानले.