Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी ०५, २०१९

चांपा गावच्या शिबिराला ग्रामस्थांचा उस्त्फुर्त प्रतिसाद

उमरेड/प्रतिनिधी:

चांपा ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच अतीश पवार यांच्या संकल्पनाने चांपा परिसरातील गोरगरिबांच्या आरोग्याच्या समस्या गावात असल्यामुळे वयोवृद्धाची मोफत डोळे तपासणी , स्त्री रोग तपासणी, ऑर्थोपेडिक हाडांची तपासणी , जनरल तपासणी करीता शनिवारी दि . ५ जानेवारी रोजी महा आरोग्य शिबिर चे आयोजन चांपा येथील नवनिर्वाचित सरपंच अतीश पवार यांनी केले , या दरम्यान आयोजित शिबिर विक्रमी ठरावे यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती.
शनिवारी दि .५-१ रोजी ग्रामपंचायतच्या भव्य प्रांगणात सहा ग्रामपंचायत चे नागरिकांनी हजेरी लावली होती , कार्यक्रमाला रेड स्वस्तिक सोसायटी नागपुर, व गटग्रामपंचायत चांपाद्वारे आयोजित महाआरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडला. महाआरोग्य शिबिराला उमरेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा .महेंद्र जूवारे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन केले व प्रमुख पाहुणे म्हणून मा सहायक गटविकास अधिकारी मा .जयसिंग जाधव होते .चांपा ग्रामपंचायत मधील युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून २५-३० तज्ज्ञ डॉक्टरांकडून उमरेड तालुक्यातील चांपा परिसरातील सहाशे रुग्णांची तपासणी करण्यात आली . शिबिराच्या यशस्वीतेसाठी आदीवासी युवा समिती व आरोग्य समिती चांपा तयार करण्यात आल्या होत्या . 
 आवश्यकतेनुसार कार्यकर्त्यांची संख्या असून, प्रत्येकाचे विषय, जबाबदारी निश्चित करण्यात आली होती . विशेष म्हणजे १०० कार्यकर्ते राखीव ठेवण्यात आले असून, आवश्यकतेनुसार त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली .महा आरोग्य शिबिर करीता ग्रामपंचायत कक्षामध्ये नेत्र तपासणी विभाग, स्त्री रोग तपासणी विभाग आणि जनरल तपासणी विभाग करण्यात आले होते .जास्तीजास्त नागरिकांची धाव डोळे तपासणी वर होती नागरिकांची गर्दी असल्यामुळे शिबिर सायंकाळी साडेपाचला संपली व मोफत औषधी वितरण व अर्थोपडिक ची सुविधा. ग्रामपंचायत च्या कक्षामध्ये औषधी भांडार व सर्व तपासण्यांची सुविधा करण्यात आली होती .

नेत्रदान, अवयवदान संकल्प 
याच ठिकाणी नेत्रदान व अवयवदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
स्वामी विवेकानंद खापरी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्र‌िया :
शिबिरस्थळी तपासणीत निवड झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया नागपुर जिल्ह्यातील जामठा खापरी येथील स्वामी विवेकानंद रुग्णालय येथे शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आले आहे. 
कचरा विल्हेवाट व्यवस्था
शस्त्रक्रिया व उपचारानंतर निर्माण होणारा वैद्यकीय कचरा व जैविक कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.तर संपूर्ण शिबिरस्थळाची स्वच्छता: करण्यासाठी आदिवासी युवा सेना अध्यक्ष शिवशंकर यांच्या सह १०० कार्यकर्ते सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती आदीवासी युवा सेना चे अध्यक्ष शिवशंकर राजपूत यांनी दिली.

आज ग्रामपंचायत चांपा येथे शनिवारी होत असलेल्या महा आरोग्य शिबिरच्या तयारीचा आढावा घेण्यात आला .
महाआरोग्य शिबिराच्या आज चांपा ग्रामपंचायत परिसरातील शिबीरस्थळावर अतीश पवार सरपंच यांनी आदीवासी युवा सेनाचे अध्यक्ष मा .शिवशंकर राजपूत व ईतर कार्यकर्त्यांशी संवाद साधत सर्व तयारीचा आढावा घेतला. आरोग्य शिबिर चे संयोजक म्हणून रेड स्वस्तिक सोसायटी नागपुर चे पदाधिकारी व सदस्य म्हणून सर्वस्वी डॉ .मिलिंद नाईक , डॉ .रोहित कळमकर , सुरेंद्र मनपिया , डॉ .जगन्नाथ गराट , लक्ष्मण शुक्ला , राजूभाऊ साखरे , सतीश घटाटे , मोहन देशमुख , वासुदेव निघोट , डॉ .आनंद काकडे , गोपाल अग्रवाल , परसराम भड, किसन बेरीया , रामदास रेवते आदी मान्यवर उपस्थित होते .चांपा ग्रामपंचायत च्या मोफत महा आरोग्य शिबिरला मोठया प्रमाणात नागरिकांकडून सहभाग मिळाला व शिबिर ला यशस्वीपणे पार पडण्यासाठी मा चांपा येथिल सरपंच अतीश पवार व उपसरपंच अर्चना सिरसाम ग्रामसेवक एस .पी .तायवाडे यांच्या मार्गदर्शनात महा आरोग्य शिबिर च्या व्यवस्थेचा जबाबदारी घेण्यात आला होती . शिबिराच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या बळावरच व रेड स्वस्तिक सोसायटी चे व गट ग्रामपंचायत मधील महाशिब‌िरचे यशस्वी झाल्याचे चांपा ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच अतीश पवार यांनी सर्व जनतेचे आभार यावेळी व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.