Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी १३, २०१९

सरताज डान्स अकादमीच्या विद्यार्थांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

 अरुण कराळे/नागपूर:

सरताज डान्स अकादमीच्या माध्यमातून उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे आयोजीत ऑल इंडिया युनिव्हर्सल रंग महोत्सव मध्ये वाडी व डिफेन्स मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य अभिनय सादर करून प्रथम पारितोषिक मिळविले . यामध्ये डिफेन्सच्या केंद्रीय विद्यालयाची वर्ग ९ ची विद्यार्थीनी हर्षिका वासनिक व दवलामेटीच्या श्री साईनाथ कॉन्व्हेंटमधील वर्ग ६ ची विद्यार्थीनी तमन्ना झा या विद्यार्थ्यांनी युगल नृत्यात प्रथम स्थान पटकाविले. आयुध निर्माणीची अंजली शंकर पोटभरे व हर्शिका वासनिक एकल नृत्यात प्रथम , वडधामना येथील कारमेल अॅकेडमीची विद्यार्थीनी सोमया मुरकुटे हिने एकल नृत्यात तृतीय ,आराध्या मुरकुटे एकल नृत्यात द्वितीय आशा बरगट एकल नृत्यात तृतीय स्थान प्राप्त केले. विजेत्या स्पर्धकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय नृत्य कोरिओग्राफर राहुल बडोले , आपले आई-वडील व शिक्षकांना दिले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.