Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी २५, २०१९

स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या विकासात लोकसहभाग महत्त्वाचा :नंदा जिचकार

स्मार्ट सिटी ‘सिटीझन ॲडव्हायजरी फोरम’ची बैठक : सादरीकरणातून दिली माहिती

नागपूर/प्रतिनिधी:

 स्मार्ट सिटीअंतर्गत देशभरात सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये नागपूरचा क्रमांक अव्वल आहे. हे केवळ नागपूरकरांच्या सहभागामुळे शक्य झाले. अशा प्रकल्पांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने शुक्रवारी (ता. २५) नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात ‘सिटीझन ॲडव्हायजरी फोरम’च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. बैठकीला एनएसएससीडीसीएलचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे, नगरसेवक राजकुमार साहू, विदर्भ टॅक्सपेअर असोशिएशनचे तेजिंदरसिंह रेणू, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी लिना बुधे, अनसुया छाबरानी, पत्रकारांचे प्रतिनिधी रवी गजभिये, राजेश प्रायकर, एनएसएससीडीसीएलचे विजय बनगीरवार उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पारडी, भरतवाडा, पुनापूर परिसरातील सुमारे १७३० एकर क्षेत्रात सुरू असलेला क्षेत्राधिष्ठीत विकास हा आदर्श ठरेल, असेच त्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या संपूर्ण प्रकल्पात लोकसहभाग लाभत असल्यामुळे होणारा विकास हा वेगाने होत आहे. यामुळेच प्रकल्प राबविण्यात नागपूर क्रमांक एक वर आहे. सिटीझन ॲडव्हायजरी फोरम म्हणजेच नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ आहे. नागरिकांच्या अडचणी, सूचना या व्यासपीठावर मांडल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

एनएसएससीडीसीएलचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची आणि कार्यप्रगतीची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. नागपूर शहरातील प्रकल्पांच्या सद्यस्थितीचे सादरीकरणही त्यांनी यावेळी केले. नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून बैठकीत सहभागी झालेल्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी उत्तरे दिलीत. सिटीझन ॲडव्हायजरी फोरमची बैठक प्रकल्पादरम्यान वेळोवेळी घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. बैठकीला स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.