नागपूर/प्रातिनिधी:
सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयन्ती निमित्य महावितरणकडून अभिवादन करण्यात आले. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ठ म्हणजे कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर आणि प्रज्वला किरनाके यांनी सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यानंतर उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी अभिवादन केल्यावर अन्य अधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
यावेळी मुख्य अभियंता दिलीप घुगल, सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उमेश शहारे, हरीश गजबे , कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर,प्रमोद धनविजय, श्रीमती प्रज्वला कन्नाके, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात,व्यस्थपाक (वित्त व लेखा) अतुल राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचलन उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.
चंद्रपूर
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 188 वी जंयती महिला मुक्तिदिन म्हणून
साजरी करण्यात आली. आदयषिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई
यंाच्या प्रतिमेस चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. अरविंद भादिकर यांनी माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी कार्यकारी अभिंयता
(प्रशासन)श्री. अनिल काळे, प्रभारी वरीष्ठ व्यवस्थापक( वि व ले)श्री. राहूल
धाकले, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी श्री. सुशिल विखार व इतर अधिकारी व
कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी क्रांतीज्योती
सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस आदरांजली अर्पण केली.