Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी १३, २०१९

मुख्यमंत्री साधणार सोमवारी चंद्रपूरच्या शेतकऱ्यांशी लोकसंवाद



 मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
लोकसंवाद साठी इमेज परिणाम
 महाराष्ट्र शासनाने शेतक-यांसाठी सुरु केलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 14 जानेवारी थेट संपर्क साधणार आहेत. चंद्रपूर जिल्हयातील 10 शेतक-यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 जानेवारीला ‘लोकसंवाद’ साधून जाणून घेतली. या लोकसंवादाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यानंतर सोमवार दि. 14 जानेवारीला सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि लाभार्थी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ‘लोकसंवाद’ होणार आहे. हा थेट लाईव्ह संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे.

यामध्ये वेगवेगळया योजनांचा लाभ घेतलेल्या शेतक-यांचा सहभाग आहे. मुख्यत्वे शेतीत विविध प्रयोग आणि सोबतच योजनांचा लाभ घेऊन कायापालट करण्याची क्षमता असणारे हे शेतकरी आहे. सोमवारी सकाळी 10 ला हे शेतकरी बोलणार आहे. 
हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या www.twitter.com/Dev_Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर तसेचwww.facebook.com/devendra.fadnavis या फेसबुक पेजवर आणि www.youtube.com/DevendraFadnavis या युट्यूब चॅनलसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे ट्विटर www.twitter.com/MahaDGIPRwww.facebook.com/ MahaDGIPR या फेसबुक पेजसह www.youtube.com/maharashtradgipr या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. त्याशिवाय http://elearning.parthinfotech.in/ या लिंकवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी,फळबागा, कांदा चाळ, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, अन्न प्रक्रिया, शेडनेट,पॉली हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांबाबत सातत्याने आढावा घेतला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.