Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १४, २०१९

खडगावात दहादिवशीय युवा शक्ती व कौशल्य विकास शिबीर

नागपूर / अरुण कराळे:

खडगाव ग्रामपंचायत व जवाहरलाल नेहरू महाविद्यालय वाडी यांच्या संयुक्त सहकार्याने खडगाव येथे दहादिवशीय स्वच्छ भारत अभियान, युवा शक्ती व कौशल्य विकास शिबीर रविवार १३ जानेवारी रोजी राबविण्यात आला .गावातुन ग्राम स्वच्छता दिंडी काढुन गावातील नागरीकांना स्वच्छतेविषयी महत्व पटवून दिले . तसेच या दिंडीत विद्यार्थ्यांनी स्वच्छता असेल जिथे, लक्ष्मी वसेल तिथे, राखू परिसर स्वच्छ , ठेवेल आरोग्य स्वस्थ , अशा प्रकारचे नारे देवून परिसर स्वच्छ ठेवा असे आवाहन केले.

 गावातील नागरीक व जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अतंर्गत विद्यार्थ्यानी उस्फुर्तपणे स्वच्छता अभियानात भाग घेतला . विद्यार्थ्यांनी प्रत्येक घरी जाऊन स्वच्छतेचे महत्व सांगीतले . स्वच्छतेचा मंत्र आत्मसात करून जसे स्वतःचे घर स्वच्छ करतो त्याच प्रकारे परिसर सुद्धा स्वच्छ ठेवण्याचे आवाहन माजी सरपंच व सदस्य देवराव कडू यांनी केले . उदघाटन व्हीएसटीएम अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशनचे सचिव युवराज चालखोर यांनी केले . प्रमुख पाहूणे म्हणून एमसीईडीचे श्री वाघमारे , डॉ . प्राचार्य जीवन दोंतुलवार, माजी सरपंच व सदस्य देवराव कडू , सरपंच रेखा मून, उपसरपंच किशोर सरोदे, सचिव नंदकिशोर निमगडे, प्रा .डॉ . संजय टेकाडे , प्रा .डॉ .सुधाकर बोरकर , प्रा .डॉ . सारंग खडसे ,शितल उईके,सरला कडु, संघमित्रा गव्हांदे, वंदना महल्ले, रेणूका गोमकार, ज्योती ठाकरे, संगीता खुसपरे , मनोज कडु , चंद्रशेखर गणवीर, गोपाल ताकीत ,गणेश रहांगडाले ,दत्तुजी कडु, प्रशांत डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते .

 प्रास्तावीक, डॉ . प्राचार्य जीवन दोंतुलवार, सुत्रसंचालन प्रा .डॉ . संजय टेकाडे , आभार प्रदर्शन डॉ .सुधाकर बोरकर यांनी केले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.