Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २९, २०१९

भरधाव टिप्परने दोघांना चिरडले

मनोज चिचघरे/भंडारा प्रतिनिधी 

पवनी :भरधाव टिप्परने चिरडल्याने दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील बेडाळा गावाजवळ सोमवारी २.३० वाजताच्या सुमारास घडली,  या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. तब्बल सहा तासानंतर मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तोपयेँत मृतदेह रस्त्यावरच होते. श्यामसुंदर बाळाजी रायपूर (५०), परसराम कवडू दोहतरे (६५),रा, वायगाव ता, पवनी अशी मृतांची नावे आहेत, 

पवनी येथील एका लंग्न समारंभ आटोपून ते आपल्या दुचाकीने गावी जात होते, बेडाळा गावाजवळील पेट्रोलपंपासमोर राँग साईड आलेल्या एका टिप्परने या दोघांना धडक दिली. दोघेही टिप्परच्या समोर चाकाखाली अक्षरशः चिरडले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती होताच संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, व तालुका शकराव तेलमासरे, पंचायत समिती सभापती बंडू ढेंगरे, विकास राऊत, प्रकाश पंचारे, जि, पं, सदस्य मनोरथा जांभुळे, यांनी उपविभागीय अधिकारी पांचाळ, अप्पर पोलिस अधीक्षक, रश्मी नांदेडकर, घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर टायर पेटवून पवनी - नागपूर राज्यमागेँ रोखून धरला. या घटनेची माहिती होताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील पेटले टायर बाजूला करण्यात आले. परंतु संतप्त जमावापुढे त्यांचे काहीही चालत नव्हते. मृतकाच्या परिवारला ट्रक मालकाकडू मृतकाच्या परिवाराला प्रत्येक तीन लाख रोख देण्यात आले, तसचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येेकी १० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्याचे ठरविण्यात आले. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.