Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी ०४, २०१९

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
संबंधित इमेज
जिल्ह्यात दारूबंदी कुठेच दुसून येत नाही. उलट महाराष्ट्राव्यतिरिक्त तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश हरियाणा येथील विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच राज्य सरकारने विदेशी दारूवर २५  टक्के उत्पादन शुल्क वाढ व राज्यात १ हजार ५०० परमीट रूम उघडण्याची घोषणा करीत राज्याच्या महसुलात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तत्काळ हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी चंद्रपूर लिकर असोसिएशनचे सल्लागार दीपक जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली.

 जयस्वाल म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदी होऊन  चार वर्षे पूर्ण होत आलीत. पण येथे दारूबंदी फसलेली आहे. महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातून विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचप्रमाणे बनावटी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. पण ही बाब प्रशासनाने लपवून ठेवलेली आहे. त्याच जिल्ह्यात गांजा, अफीम, ब्राऊन शुगर पावडर याचे प्रमाण युवक वर्गात वाढले असून त्याला आळा बसणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासन आपले काम चोखपणे करीत असल्याचे सांगत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नसती तर ठाणेदार छत्रपती चिडे यांची हत्या सुद्धा झाली नसती. याला सुद्धा दारूबंदीच कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

राज्यावर ५ लाख कोटी प्रक्षा जास्त कर्ज आहे. त्यातच राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाची घोषणा केलेली असून त्याचा बोजा तिजोरीवर प्रत्येक वर्षी २१ हजार ५०० कोटींनी वाढणार आहे. तेव्हा हा पैसा आणणार कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याची गंभीर दखल घेण्याची मागणी करीत ज्यामुळे राज्याच्या तिजोरीत ६०० कोटींची वाढ होईल असेही दीपक जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

ऑगस्ट 2018 पासून भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचे प्रस्तावित होते. ही वाढ करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आज अखेर नव्या वर्षाचा मुहूर्त गाठला. उत्पादन शुल्कातील वाढ आजपासून अमलात आली असून, त्यामुळे व्हीस्की, स्कॉंच, वोडकाचे दर सरासरी 15 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढणार आहेत. 

 ऑगस्ट 2018 पासून भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचे प्रस्तावित होते. ही वाढ करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आज अखेर नव्या वर्षाचा मुहूर्त गाठला. उत्पादन शुल्कातील वाढ आजपासून अमलात आली असून, त्यामुळे व्हीस्की, स्कॉंच, वोडकाचे दर सरासरी 15 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढणार आहेत. 

 यावेळी लिकर असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा हरविंदरसिंग भाटीया यांच्यासह रामदास ताजने, विलास नेरकर, व्यंकटेश बालसनीवर, संजय रणदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.