Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर ०१, २०१८

अवयवदानासाठी जनजागृतीची गरज:देशपांडे

परभणी/गोविंद मठपती :
अवयव आणि  देहदान महासंघ मुंबई आयोजित औरंगाबाद ते तुळजापूर जनजागृती पदयात्रे चे स्वागत व या विषयावरील जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब मानवत -पाथरी च्या वतिने शहरातील हॉटेल सीटी प्राईड या ठिकाणी करण्यात आले. या विषयीचे सखोल मार्गदर्शन मुंबईकर देशपांडे बंधूनी केले.            
               
   आपल्या मृत्यूनंतरही आपले हे शरीर आणि शरीराचे अवयव दुस-या व्यक्तीसाठी उपयोगी पडले तर त्यासारखे अन्य पुण्य नाही.परंतु अवयव दान व देहदान याविषयीची जनजागृती होणे गरजेच असल्याची मत व्यक्त केले.                                                                 
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे डॉ.जगदीश शिंदे, डॉ.मानवतकर, डॉ.अतुल भाले आदींसह जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
देशपांडे पुढे बोलताना म्हणाले की, स्वयंसेवी संस्था, मंडळे वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करताना दिसतात. नेत्रदानाचेही महत्त्व आता लोकांना पटू लागलेय. त्यामुळे नेत्रदान करण्याकडेही त्यांचा कल वाढू लागलाय. परंतु अवयवदात्यांची संख्या त्यामानाने कमी आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे अजूनही अनेकांच्या मनात अवयवदानाविषयी गैरसमज आहेत. अभ्यासक्रमामध्ये नेत्रदानाविषयी, रक्तदानाविषयी माहिती असते. मात्र आता अवयवदानाविषयी माहिती देणे गरजेचे आहे. किडनी, यकृत,फुपूसे,हृदय, त्वचा इत्यादी अवयव मृत्यूनंतर गरजू व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात. पुराणकाळातील दधिची ऋषींनी तर आपली हाडे दान दिली होती. त्या अस्थीपासून तयार केलेल्या वज्राने वृत्रासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यात आला होता, अशी कथा आहे. पण तरीही अवयवदान म्हटले की भारतीय मध्ये कमालीची अंधश्रद्धा आहे .                    

  पूर्वी रक्तदान, नेत्रदान करण्यास सहजासहजी कुणी व्यक्ती पुढे येत नव्हते. आता त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगभर अवयव दानाचे महत्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करुन समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना आपण पाहतो.                     
   अवयवदान म्हणजे एखादी आजारी व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या टप्यात असताना वयक्तिक किंव्हा नातेवाईकांच्या इच्छे नुसार त्याच्या शरीरातील अमूल्य अश्या 9 अवयवांचे प्रत्यारोपण इतर गरजू रुग्णांच्या शरीरात करण्याची परवानगी देणे व या 9 व्यक्तींना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचण्याचा अमूल्य असं सत्कार्य.         त्यामुळे कुणाला किडनी मिळते तर कुणाला डोळे, किडनी, लिव्हर, हृदय,फुपूसे अश्या महत्वपूर्ण अवयवांमुळे बऱ्याच रुग्णांना  जीवदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतात.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.