अरुण कराळे/नागपूर:
नागपूर पंचायत समितीच्या तेरा गावात होणार स्वच्छता अभियान सर्वे
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता व स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत नागपूर पंचायत समितीमधील तेरा गावातील स्वच्छता अभियान सर्वेसाठी नागपूर पंचायत समितीच्या सभापती नम्रता राऊत व उपसभापती सुजित नितनवरे यांनी शनिवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हिरवी झेंडी दाखवून स्वच्छता अभियान सर्वेला सुरुवात करण्यात आली . ही स्वच्छता दिंडी विहीरगाव, उमरगाव, कळमना, पिपळा,चीकना,गोधनी ( रेल्वे ) चिचोली, खडगाव, पेठ ,शिरपूर,सातनवरी या गावातील स्वच्छतेचा सर्वे करणार आहे . स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर एलईडी व्हेन द्वारे संदेश प्रारंभ करण्याबाबत ग्रामपंचायत स्तरावरच्या निवड झालेल्या ग्रामपंचायतीला स्वच्छतेचे महत्व समजावून सर्व जनतेला गाव व स्वतः स्वच्छ राहण्याचा संदेश यामध्ये देण्यात आला . दिडींत गाव स्वच्छ ठेवू ,स्पर्धेत भाग घेऊ , गाडगेबाबांचा एकच मंत्र ,स्वच्छतेचे जाणा तंत्र, आता आपला एकच विचार , शाश्वत स्वच्छतेचा करू या निर्धार , वैयक्तीक स्वच्छतेची महती , रोगापासून मिळेल मुक्ती आदीची माहीती देण्यात आली .याप्रसंगी खंडविकास अधिकारी किरण कोवे, शेषराव चव्हाण, शाखा अभियंता गुणवंत पंखराज, विलास भाजीपाले ,प्रमोद राऊत, गोविंद गडदे ,दीपक गणवीर ,रमेश कावडे, प्रशांत तुमसरे आदी प्रामुख्याने उपस्थित होती .