पवनी पोलिसांची कारवाई : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाला अटक
मनोज चिचघरे/भंडारा प्रतिनिधी
पवनी: दारुबंदीअसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कारमधून जाणारी दारु पवनी तालुक्यातील निष्टी -भुयार मार्गोवर पोलिसांनी जप्त केली,
देशी दारूचे आठ आणि विदेशी दारुचे दोन बॉक्स या कारमध्ये आढळून आले,
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असल्याने जंगल मार्गावरुन दारुची आलिशान वाहनातून तस्करी केली जाते, पोलिसांना मिळालेल्या पोपनीय माहितीवरु
निष्टी -भुयार जंगलात सापळा रचण्यात आला,
त्यावेळी एका स्विफ्ट कारची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूचे आठ बक्से किंमत २२ हजार ७६ रुपये तर विदेशी दारुचे दोन बक्से किंमत १२ हजार ४८० रुपये आढळून आली, या प्रकरणी आरोपी मोहसीन पठान (२४) रा, नागभिड जि ,चंद्रपूर याला अटक करण्यात आली,हि कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे
यांच्या मार्गदर्शनाखाली भारत ढाकणे, संतोष चव्हाण, शिपाई मुंडे, यांनी केली, चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाली, तेव्हापासून सीमावर्ती भागातील गावातुन दारू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, बंदी नसलेल्या जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारु पोहोचवली जाते, यासाठी आलिशान वाहनांचाही उपयोग केला जातो, तसेच गावठी दारू पोहचविण्यासाठी वाहनांच्या मोठ्या ट्युबचा उपयोग होत असल्याचेही लक्षात आले होते, पोलिसांनी कितीही नाकाबंदी आणि कारवाई केली तरी तस्कर पद्धतशीरपणे चंद्रपूर जिल्ह्यात दारु पोहचवित असल्याचे सीमावर्ती भागात दिसून येते