Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर १७, २०१८

अकोल्यात ३० डिसेंबरला महाआरोग्य अभियान

जनसामान्यांच्या आरोग्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी घेतली 
महाआरोग्य अभियानाच्या पूर्वतयारीची बैठक


अकोला,दि.17 : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी ३० डिसेंबर २०१८ रोजी अकोला शहरात महाआरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यावतीने होणाऱ्या या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक विश्रामगृह येथे घेण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवलेशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्तेप्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आरती कुलवालजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोडआयएमएचे डॉ. नरेश बजाजडॉ. संजय धोत्रेडॉ. अशोक ओळंबेडॉ. गजानन नारेमहात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुनील वाठोरेवैद्यकीय अधीक्षक डॉ. सिरसामडॉ. अश्विनी खडसे तसेच आयएएमनिमाकेमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
अकोला शहरातील लालबहादुर शास्त्री स्टेडियमवर महाआरोग्य अभियान आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सुमारे १५ हजार पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. अभियान यशस्वीतेसाठी बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विविध सूचना दिल्या. विविध कामांसाठी वेगवेगळ्या टीम नियुक्त करण्याचे निर्देश देवून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
पालकमंत्री म्हणालेशासनप्रशासन व लोकसहभागातून महाआरोग्य अभियान यशस्वी करावयाचे आहे यासाठी शासकीय सह विविध खाजगी रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थीविविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचासुध्दा अभियानात सहभाग राहणार आहे. एक्स रेसोनोग्राफीविविध चाचण्यांसाठी पॅथोलॉजीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. एमआरआयसुध्दा काढुन दिला जाणार आहे. रुग्णांसाठी औषधीही उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. रूग्णासाठी औषधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. कुलवाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशिएनशनची मदत घेतल्या जाणार आहे.
गंभीर आजाराचे रुग्ण असल्यास त्यांना मुंबईच्या टाटाहिंदूजाबिचकँडी सारख्या सहा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. या रूग्णालयांची पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील स्वत: हा संपर्कात असल्याचे सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.