Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०३, २०१८

किरायदाराने केली घरमालकाची हत्या

           अनैतिक संबंधातून पत्नीने पतीला संपविले
९ तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात
चंद्रपुर/प्रतिनिधी:
लोहारा मामला येथे एक मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आहे, माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक कोळी हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले, प्रकरणाची गंभीरता बघून पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक सुद्धा घटनास्थळी पोहचले.
अगोदर अपघात झाला असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता, पोस्टमोर्टम रिपोर्टचा अहवाल आल्याबरोबर ह्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले.

इसमाचा मृत्यू हा अपघात नव्हता त्याचा कुणी घात केला अशी माहिती समोर आली, 30 सप्टेंबर ला रामनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता मृतक हा लोहारा, मामला येथिल निवासी होता त्याच नाव उत्तम मडावी 50, हत्येच्या अगोदर उत्तम मडावी सोबत कोण होत याची संपूर्ण माहिती पोलिसांनी काढली व अवघ्या 9 तासात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
आरोपीमध्ये जगदीश रमेश पाचभाई, विशाल रामभाऊ सुटे, मृतकाची पत्नी सखुबाई मडावी यांचा समावेश होता.
आरोपी पाचभाई हा एलआयसी मध्ये अजेंट होता व तो उत्तम मडावी यांचे घरी किरायाने राहत होता, आरोपीचे उत्तम मडावी याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते, ही बाब उत्तमला कळली या गोष्टीवर उत्तमचे व सखूबाईंचे नेहमी भांडण व्हायचे.
वारंवार होणाऱ्या भांडणातून सखुबाईने मुक्त व्हायचा विचार करीत पाचभाई सोबत मिळून उत्तमचा काटा काढण्याचा निर्धार केला या कामात पाचभाई ने विशाल सुटे याला सोबत घेत, 29 सप्टेंबरच्या रात्री उत्तमला फिरायला सोबत जाऊ असे म्हणत लोहारा जवळ सोबत आणून उत्तमच्या डोक्यावर प्रहार करीत त्याला जागीच ठार केले.
घटनेनंतर आरोपीनी याची वाच्यता कुठेही न करता घरी परतले पण आरोपींची शांतता ही केवळ 9 तासासाठीच होती, कारण 9 तासात या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ रेड्डी, पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक कोळी, व कर्मचारी वृंद यांनी तपासकार्यात सहकार्य केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.