Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ३१, २०१८

आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा संघर्षातून मिळवू: जोरगेवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
घरकूल लाभार्थ्यांना घरे द्या तथा नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरुपी पट्टे द्या, या मुख्य मागणीकरिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक मोर्चाच्या स्वरुपात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

चंद्रपूर जिल्हाची ओळख अतिशय शांतप्रिय जिल्हा म्हणून आहे.त्यामुळे आमच्यावर अन्यायकारक निर्णय लादण्याची चुक करु नका, आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा रस्त्यावर उतरुन संघर्षातून मिळवु असा ईशारा किशोर जोरगेवार यांनी दिला. जैन भवन जवळून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, घरकुल योजनेच्या नावावर शासनाने २१७९५ हजाराहून नागरिकांडून अर्ज भरुन घेतले यातील १९ हजार ७६४ अर्ज पात्र ठरवीण्यात आले आहे. तर ०२ हजार २२२ अर्ज अपात्र ठरवीण्यात आले आहे. मात्र यात लाभार्थी ठरलेल्यांपैकी अदयाप घराचा लाभ मिळालेला नाही. त्यामूळे घरकुल लाभार्थी असूनही हक्काच घर प्रत्येक्षात साकार झालेल नाही. ही या लाभार्थ्यांची एक प्रकारे थट्टा असून शासनाने नागरिकांना फक्त घराचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणुक केली आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनमध्ये रोष आहें. एकीकडे योजनेतील हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्या जात आहे. तर दुसरी कडे असलेल घरही नजूलच्या जागेवर असल्याचे कारण समोर करुन त्यांना बेघर करण्याचे काम प्रशासनाकडून केल्या जात आहे. असे असतांनाही चंद्रपूकर शांत आहे. हा त्यांचा संयम आहे. मात्र त्यांचा संयम आता तुटत असून आपल्या हक्कासाठी संघर्ष करायला चंद्रपूरकर सज्ज झाला आहे. याचीच साक्ष देणारा आजचा हा अभुदपुर्व मोर्चा असून हा संघर्ष यापूढेही असाच सुरु ठेवत आणखी तिव्र करु असा ईशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

हक्काच घर मिळालाच पाहिजे असा नारा बुलंद करत हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चाच्या मार्गावरील महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, इंदिरा गांधी यांच्या पुतळयाला जोरगेवार यांनी माल्यार्पण केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचताच जोरगेवार यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना दिले. घरकुल योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल बांधून देण्यात यावे, या योजनेतील अटी शीथील करुन अपात्र ठरलेल्या अर्जंदारांनाही घकुलाचा लाभ देण्यात यावा, या योजनेची नोंदनी प्रक्रिया पुन्हा सुरु करुन अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, नजूलच्या जागेवर घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना स्थायी स्वरुपी पट्टे देण्यात यावे, आदि मागण्यांचा या निवेदणात समावेश आहे. या मागण्यांचे गांभिर्य लक्षात घेता जिल्हाधिका-यांनीही याबाबत तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन जोरगेवार यांना दिले. यावेळी विनोद अनंतवार, सुनील पाटील, अमोल शेंडे, देविदास बानबले, इरफान शेख, सलीम मामू, कांबळेजी, संजय बुटले, वैष्णवी मेश्राम, वंदना, हातगावकर, संतोषी चव्हाण, रजनी चिंचोळकर, शांता धांडे, माला तुरारे, सुजाता बल्ली, विजया बच्छाव, नितीन नागरिकर, टिकाराम गावंडे, आनंद इंगळे, विनोद दुर्गे, रुपेश पांडे, राशीद हुसैन, ईमरान खान, दीपक पद्मगिरीवार, किशोर बोल्लमवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी, गोपी, सुरज चव्हाण, दिलीप बेंडले, अजय सिद्धमशेट्टीवार, राहुल मोहुर्ले, नसीब गेडाम, शंकर दंतुलवार, कुणाल जोरगेवार, विजय वरवडे, यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.