Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर ०४, २०१८

555000 रुपये किंमतीची नवी अॅस्पायर सादर

नागपूर : फोर्ड इंडियातर्फे कॉम्पॅक्ट सेदान – नवी फोर्ड अॅस्पायर 555000 रुपये इतक्या आकर्षक किंमतीमध्ये नागपूर मधील भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आली. नवी फोर्ड अॅस्पायर पॉवर, स्टाइल आणि मूलतत्त्व यात अग्रणी असलेल्या फोर्ड अॅस्पायर कॉम्पॅक्ट सेदानमधली एकदम नवी गाडी आहे, यात सर्वोत्तम तंत्रज्ञान, सर्वोत्तम दर्जाची सुरक्षा, गाडी चालवण्यात मिळणारा आनंद आणि ओनरशीपसाठीची अविश्वसनीय किंमत अशी वैशिष्ट्ये आहेत.

ही गाडी दोन इंधन प्रकारांमध्ये पाच विविध प्रकारांत आणि सात रंगांत उपलब्ध आहे.
``नवी फोर्ड अॅस्पायर म्हणजे एक परिपूर्ण पॅकेज आहे. इतर लोक जे करतात तेच करायचं नसतं अशा लोकांसाठी ही गाडी खास करून बनवण्यात आली आहे आणि ही गाडी म्हणजे फक्त एका साध्या कारच्या अनुभवापेक्षा अधिक काही आहे,’’ असे फोर्ड इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा म्हणाले. ``अनेक प्रकारांमध्ये सर्वोत्तम असलेल्या आणि उद्योगक्षेत्रातील अनेक उत्तम वैशिष्ट्ये अंतर्भूत असलेल्या नव्या फोर्ड अॅस्पायरमुळे ग्राहकांना मनासारखी गाडी प्राप्त होणार आहे – या गाडीचा लूक उत्तम आहेत, ही गाडी चालवणे अतिशय उत्तम अनुभव असणार आहे, याची सुरक्षितता सर्वोत्तम आहे, इतकेच नाही तर परवडणाऱ्या किंमतीमध्ये ओनरशीपचा अनुभव ही गाडी देत आहे.’’


इतरांना फॉलो न करता अग्रेसर राहणारी नव्या फोर्ड अॅस्पायरच्या क्षमता सर्वात जास्त आहेत आणि फोर्ड चालवण्यात अधिक धमाल येते. ही फोर्डची नवी कॉम्पॅक्ट सेदान तीन सिलिंडरची, 1.2 टीआयव्हीसीटी पेट्रोल इंजिनची गाडी आहे, हे इंजिन लहान असते, वजनाला कमी असते आणि इंधन सक्षम असते. हे इंजिन नैसर्गिकपणे सर्वोत्तम अशी 96 पीएसची पीक पॉवर देते आणि 20.4 किमी/आयसाठी 120 एनएम टॉर्क इतकी अप्रतिम इंधन सक्षमता देते.
डिझेलच्या गाड्या आवडणाऱ्यांसाठी फोर्ड अॅस्पायरमध्ये 1.5 लीटचे टीडीसीआय इंजिन सर्वोत्तम दर्जाची 100 पीएस पीक पॉवर, 2015 एनएम टॉर्क आणि 26.1 किमी/आयला इंधन सक्षमता देते.
ही दोन्ही इंजिन पूर्णपणे नवीन आहेत, पाच स्पीडच्या मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ते येते आणि गाडी चालवण्यासाठीचा धमाल अनुभव देते. हे मॅन्युअल ट्रान्समिशन १५ टक्के सौम्य आहे आणि यामुळे एनव्हीएचमध्ये घट करून इंधन सक्षमता सुधारण्यास मदत होते. यासाठी प्रीडीसेसरपेक्षा ४० टक्के कमी गिअर ऑईल लागते. गाडी चालकाला अधिक सौम्य, हळूवार गिअर टाकण्याचा अनुभव प्राप्त होणार आहे.
नव्या फोर्ड अॅस्पायरच्या उत्तम उत्पादनाच्या पर्यायांमध्ये, फोर्डने सर्वात नवीन सहा स्पीडच्या ऑटोमेटिक ट्रान्समिशन प्रकाराचाही समावेश केला आहे. 1.5 लीटर पेट्रोल, तीन सिलिंडरचे इंजिन आणि ऑटोमेटिक फोर्ड अॅस्पायर 123 पीक पॉवर देते. तीनही इंजिन आपापल्या प्रकारांमध्ये सर्वोत्तम आहेत.
हृदय जिंकणारी, लक्ष वेधून घेणारी स्टाइल
कॉम्पॅक्ट, सब मीटर डिझाइनची नवी फोर्ड अॅस्पायर अतिशय स्मार्ट प्रकारे प्रत्येक कोनातून आकर्षक दिसेल अशी तयार करण्यात आली आहे.
या गाडीची पुढील काही वैशिष्ट्ये पुन्हा नव्याने बनवण्यात आली आहेत, यात डायनॅमिक ३ डायमेन्शनल ग्रील बसवण्यात आले आहे. यामुळे ही गाडी सर्वांमध्ये उठून तर दिसतेच पण ती धावतेही सुसाट. धुक्यासाठीचे नवीन दिवे प्रिमिअम क्रोममध्ये पुढील बंपरवर आकर्षकपणे बसवण्यात आले आहेत. नवीन फोर्ड अॅस्पायरचे हेडलँप दिसायला स्पोर्टी आहेतच, शिवाय त्यांची कामगिरीही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याबरोबरच टेल लँपचे नवीन डिझाइन रस्त्यावर अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात.
नवीन फोर्ड अस्पायरमध्ये प्रिमिअम अलॉय आणि मोठी १५ इंची चाके आहेत. त्यामुळे आत्मविश्वासपूर्ण दमदार ड्राइव्ह करणे शक्य होते.
इतकेच नाही तर नवीन फोर्ड अॅस्पायरचे इंटिरिअर अतिशय उबदार आणि बेज रंगातील आहे. यामुळे आतील जागा विस्तृत वाटते. तुमचा प्रत्येक प्रवास आरामदायी होण्यासाठी सीटला चांगला सपोर्ट देण्यात आला आहे. यात मध्यभागी आर्मरेस्ट आणि मागच्या बाजूला दोन कप किंवा बॉटल होल्डर देण्यात आले आहेत.
केबिनमध्ये तर अतिशय चांगली वैशिष्ट्ये आहेत. यात रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सर्वोत्तम ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल यंत्रणा, दोन यूएसबीचे स्लॉट, गाडी सुरू आणि बंद करण्यासाठी पुश-बटण, इलेक्टोक्रोमिक आयआरव्हीएम, रेन सेन्सिंग वायपर्स आणि ऑटोमेटिक हेडलँप्सचा समावेश आहे.
योग्य मूल्य, सुरक्षितता आणि कनेक्टिव्हिटी
नवी फोर्ड अॅस्पायर म्हणजे एक परिपूर्ण पॅकेज आहे. गाडीच्या मालकांना नावीन्यपूर्ण सेवा देणारी, सर्व सुविधांचा समावेश असलेली, करमणुकीची आणि सुरक्षिततेची साधने असलेली ही गाडी आहे.
या कॉम्पॅक्ट सेदानमध्येही फोर्डची नेहमीची सुरक्षितता कायम राखण्यात आली आहे, यात विविध लाइन-अपवर दुहेरी एअर-बॅग देण्यात आल्या आहेत. ज्यांना अधिक चांगली सुरक्षितता हवी आहे, त्यांना सर्वोत्तम टिटॅनियम+ट्रीमवरील सहा एअरबॅग देण्यात येत आहेत.
एअरबॅगबरोबरच फोर्ड अॅस्पायरमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन (ईबीडी), चालकांसाठी अधिक चांगली ग्रीप अशी सुरक्षिततेची विविध वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
नवी फोर्ड अॅस्पायर गाडीच्या मालकांना इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ईएसपी) आणि इलेक्ट्रॉनिक पॉवर असिस्टंट स्टिअरिंग (ईपीएएस)सह गाडी जलद वळवणे किंवा झुकवणे यासाठी दिशानिर्देशन करते. याबरोबर ऑटोमेटिक ट्रान्समिशन या हिल-लाँच असिस्ट वैशिष्ट्यासह अधिक चांगले नियंत्रण प्राप्त होते.
नव्या फोर्ड अॅस्पायरमध्ये माहितीसाठी नवी यंत्रणा, एसवायएनसी 3, 6.5 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामुळे गाडी चालकाचे करमणूक आणि स्मार्टफोनच्या आवाजाच्या कमांडवरील नियंत्रण पक्के राहाते.
एसवायएनसी 3 यंत्रणा अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो पूरक आहे आणि याद्वारे चालकांना त्यांच्या अॅपल कारप्ले किंवा अँड्रॉइड ऑटोद्वारे फोन गाडीला जोडता येतात आणि दिशानिर्देशकही वापरता येते. एसवायएनसी 3 यंत्रणा इमर्जन्सी असिस्टंसही देते. हे खऱ्या अर्थाने जीवन सावरणारे तंत्रज्ञान आहे, यामध्ये दुर्दैवाने अपघात झाल्यास जोडलेल्या फोनमधून इमर्जन्सी सेवांना आपोआप फोन लावला जातो.
तुम्हाला मनःशांती देणारी नवी फोर्ड अॅस्पायर ही पहिल्या पाच वर्षांसाठी किंवा १००,००० किमींसाठी वॉरंटी देणारी पहिल्या दर्जाची भारतातील एकमेव कॉम्पॅक्ट सेदान आहे. यामध्ये दोन वर्षांच्या फॅक्टरी वॉरंटी आणि ३ वर्षांच्या विस्तारीत वॉरंटीचा समावेश आहे.
याबरोबरच नवीन फोर्ड अॅस्पायरसाठी देखभालीचा खर्चही अतिशय कमी आहे. १००,००० किमीपेक्षा जास्त अंतरानंतर प्रति किमी ३८ पैसे पेट्रोलच्या गाडीसाठी आणि ४६ पैसे प्रति किमी डिझेलच्या गाडीसाठी खर्च येतो.
``नव्या फोर्ड अॅस्पायरच्या पाच वर्षांच्या वॉरंटीद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांप्रति असलेली वचनबद्धता अधोरेखित करत आहोत, ग्राहक आमचे कुटुंब आहे आणि ओनरशीप सायकलद्वारे त्यांच्या मनःशांतीची आम्ही खात्री देतो,’’ असे फोर्ड इंडियाचे वितरण, विक्री आणि सेवा विभागाचे कार्यकारी संचालक विनय रैना म्हणाले. ``ग्राहकांना आकर्षक किंमतीमधली आमचे नवीन उत्पादन आनंददायी वाटेल अशी मला खात्री वाटते.’’
नवी फोर्ड अॅस्पायर फोर्ड इंडियाच्या गुजरातमधील साणंद फॅक्टरीमध्ये भारतातील तसेच भारताबाहेरील ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे.
कॉम्पॅक्ट सेदान सात रंगांमध्ये उपलब्ध आहे, यात व्हाइट गोल्ड, मूनडस्ट सिल्वर, स्मोकी ग्रे, अॅबसोल्यूट ब्लॅक डीप इम्पॅक्ट ब्लू, रूबी रेड आणि ऑक्सफर्ड व्हाइट अशा रंगांचा समावेश आहे.
Manual Transmission
Petrol (1.2L TiVCT)
Diesel (1.5L TDCi)
New Ford Aspire Ambiente
INR 555,000
INR 645,000
New Ford Aspire Trend
INR 599,000
INR 689,000
New Ford Aspire Trend [+]
INR 639,000
INR 729,000
New Ford Aspire Titanium
INR 679,000
INR 769,000
New Ford Aspire Titanium [+]
INR 724,000
INR 814,000
Automatic Transmission
Petrol (1.5L TiVCT)
New Ford Aspire Titanium
INR 849,000
*Editor’s Note: All prices ex-showroom, Pan-India.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.