चंद्रपूर वीज केंद्राचे कार्य उत्तम
शून्य डॅमरेजचे व्यवस्थापन करा
ईज ऑफ डुइंग बिजनेस संकल्पना साकारा
चंद्रपूर वीज केंद्राचा देशात नावलौकिक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संचलन व देखभाल दुरुस्तीची कामे अधिक योग्य रीतीने केल्यास संयंत्र वीज वापरात घट होऊन,महत्तम वीज उत्पादन व आर्थिक बचत होण्यास मोठा हातभार लागेल. उप मुख्य अभियंता स्तराच्या अधिकाऱ्याने वीज उत्पादनासाठी चांगला कोळसा मिळविण्याकरिता कसोशीने पाठपुरावा करावा शून्य डॅमरेजचे व्यवस्थापन करावे. वीज उत्पादनाच्या दैनंदिन कामकाजात अधिक व्यावसायिक सुलभतेची अंमलबजावणी करून अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यासंबंधी त्यांनी वीज अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
बंद झालेल्या दोन संचाच्या जागेवर ऊर्जा प्रकल्प
वयोमानपरत्वे चंद्रपूर वीज केंद्राच्या बंद केलेल्या प्रत्येकी २१० मेगावाट संच क्रमांक १ व २ च्या जागेवर सुमारे १००० मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प किंवा ६६० मेगावाट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प उभारता येईल काय यादृष्टीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश माननीय उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले. संच क्रमांक १ व २ साठी आरक्षित असलेल्या राख बंधारा परिसरात १०० मेगावाट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठीची स्वारस्य अभिरुची सूचना प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे ऊर्जावान उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली, आढावा बैठक घेतली व अधिकारी-अभियंते-कामगार, संघटना प्रतिनिधी, कंत्राटदार-कंत्राटी कामगार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींशी संवाद साधला. ऊर्जामंत्र्यांची चंद्रपूर वीज केंद्राला प्रथमच भेट असल्याने येथील अधिकारी-कामगारांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली त्यानंतर ५०० मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक ८ व ९ प्लांट कंट्रोल रूम, ई.एस.पी. परिसर, उपाहार गृह, कुलिंग टॉवरला भेट दिली व तंत्रज्ञ आणि कंत्राटी कामगारांशी थेट संवाद साधला. त्यानंतर, ५०० मेगावाट सेवा इमारत येथील सर्च सभागृह येथे आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वीज केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. मागील वर्षी पाउस कमी झाल्याने पाणी बचतीसह वीज उत्पादन कायम राखल्याबद्दल त्यांनी वीज अधिकाऱ्यांचे कौतुक केले व चंद्रपूर वीज केंद्राचे कार्य उत्तम असल्याचे गौरवोद्गार काढले. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी याबाबतचे संगणकीय सादरीकरण केले. ज्यामध्ये संचालक पाच सूत्री कार्यक्रम अंतर्गत केलेल्या अभिनव तथा कल्पक कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
हिराई अतिथीगृह येथील बैठकीत आमदार नाना श्यामकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर दौऱ्यात महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, सल्लागार तथा संचालक(खनिकर्म) श्याम वर्धने, कार्यकारी संचालक विनोद बोंदरे, राजू बुरडे, प्रदीप शिंगाडे, मुख्य अभियंते जयंत बोबडे, अनंत देवतारे, ज्ञानोबा मुंडे, मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय पाटील तसेच वीज केंद्राचे उप मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
(बातम्यांच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा ९१७५९३७९२५)
(बातम्यांच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा ९१७५९३७९२५)