Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर ०३, २०१८

महावितरणच्या वीजग्राहकांसाठी वीजमीटरची राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्धता

Image result for वीज मिटरनागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी नवे वीजमीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून कुठेही मीटरचा तुटवडा नाही. तसेच वीज मीटरचा तुटवडा जाणवू नये म्हणून महावितरणने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. मागील काही महिन्यांत केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दिनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. तसेच संपूर्ण राज्यात जुनी इलेक्ट्रो-मेकॅनीकल मीटर व नादुरुस्त मीटर बदलविण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात मीटरचा तुटवडा जाणवला होता. परंतु आता राज्यात कुठेही मीटरचा तुटवडा नाही. 
महावितरणच्या विविध कार्यालयांत सिंगल फेजचे सध्या सुमारे २ लाख ३१ हजार तर थ्रीफेजचे सुमारे १ लाख ६३ हजार नवीन मीटर उपलब्ध आहेत. याशिवाय महावितरणने ३० लाख नवीन सिंगलफेज वीजमीटरची खरेदी केली असून पहिल्या टप्प्यात त्यातील ८९ हजार नवीन मीटर ऑगस्ट महिन्यात विविध कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सप्टेंबर महिन्यात सुमारे २ लाख ६० हजार मीटर्स उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यात सुमारे ३ लाख ८० हजार नवीन वीजमीटर ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. २०१९ च्या मे महिन्यापर्यन्त हे ३० लाख मीटर महावितरणला मिळणार आहेत. 
भविष्यात महावितरणच्या वीजग्राहकांना नवीन मीटरची टंचाई जाणवू नये म्हणून आणखी २० लाख मीटर नव्याने घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना महावितरणकडे असलेली मीटर्सची उपलब्धता महावितरणच्या www. mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.