Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर २५, २०१८

'ट्विस्टिंग फेट' प्रॅक्टिस गाईडचे प्रमोशन

अॅलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या “पिंक इज नाऊ”
या स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती मोहिमेचे  द्वितीय वर्ष
मोहिमेच्या दूत डॉ. पामेला मुन्स्टर यांनी लिहिलेल्या 'ट्विस्टिंग फेट' या  प्रॅक्टिस गाईडचे प्रमोशन



नागपूर/प्रतिनिधी:
२३ सप्टेंबर २०१८,नागपूर, महाराष्ट्र: जागतिक स्तरावर सामान्यपणे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा कर्करोग म्हणजे स्तनांचा कर्करोग आणि विशेषतः विकसनशील देशांमध्ये ह्याचे प्रमाण वाढत आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ज्यातील बहुतेक प्रकरणांचे निदान उशिरा होते. “पिंक इज नाऊ” या मोहिमेच्या माध्यामतून अॅलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे स्तनांच्या जनजागृती करण्यात येत आहे. 
‘पिंक इज नाऊ’ हे जुलेखा हेल्थकेअर ग्रुपच्या सीएसआर अॅक्टीव्हिटी पैकी एक असून, कर्करोगावरील प्रतिबंध, आजाराचे लवकर निदान आणि रुग्ण व त्याच्या आजाराचे योग्य व्यवस्थापन यावर भर दिला जातो. पिंक इज नाऊ अभियानाचा हेतू स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे आणि नियमित तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. अॅलेक्सिस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ पामेला मुन्स्टर यांना मुख्य पाहुणे म्हणून तर मोहिमच्या दूत आणि सह-अध्यक्षा श्रीमती झानुबिया शम्स आणि इतर मान्यवरांसह सन्मानित केले.

स्वागत समारंभ आणि दीप-प्रज्वालानाचा कार्यक्रम झाल्यानंतर रुग्णांनी त्यांचे अनुभव सांगितले. कार्यक्रमात डॉ. मुन्स्टर यांनी डॉ. अमोल डोंगरे, सल्लागार - वैद्यकीय ओन्कोलॉजी, डॉ. आरिफ खान, सल्लागार - वैद्यकीय ओन्कोलॉजी, डॉ. सूरज अग्रवाल, सल्लागार - सर्जिकल ओन्कोलॉजी, डॉ. चांदनी होतवानी सल्लागार- रेडिएशन ऑन्कोलॉजी, डॉ. पुनीत सेठ, सल्लागार - रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि डॉ. शनु जैन, सल्लागार रेडिएशन ऑन्कोलॉजी यांच्या पॅनल सोबत चर्चा केली. 
या जनजागृती अभियानादरम्यान विनामूल्य मॅमोग्राफी सुविधेची घोषणा झाल्यानंतर पॅनेल चर्चा झाली. या वर्षी अॅलेक्सिस हॉस्पिटल तर्फे ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत विनामूल्य वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला आणि मॅमोग्राम स्क्रीनिंग चाचणीची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत ​​आहे.

मोहिमेत डॉ. पामेला मुन्स्टर यांनी लिहिलेल्या ‘ट्विस्टिंग फेट’ या बीआरसीए म्युटेशन आणि वास्तविक उपचार प्रक्रियेसह प्रेरणादायी आणि मार्गदर्शक प्रॅक्टिस गाईडचे प्रमोशन देखील करण्यात आले. स्तनांच्या कर्करोगाबाबत संशोधन करणाऱ्या आणि रोगासोबत जगणाऱ्या स्त्री चे पुस्तक स्तनांच्या कर्करोगाच्या वैद्यकीय आणि भावनिक पैलूंनी परिपूर्ण उत्तम मार्गदर्शक आहे. 
मोहिमच्या दूत आणि अॅलेक्सिस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सह-अध्यक्षा श्रीमती झानुबिया शम्स यांनी सांगितले कि, पिंक इज नाऊ हि मोहीमेने असंख्य स्त्रियांचे जीवन बदलले आहे आणि युएईमध्ये या अभियानामुळे अनेक चांगले बदल घडले आहेत, म्हणूनच गेल्या वर्षीपासून या मोहिमेच्या माध्यमातून भारतीय महिलांना याचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. स्तनाच्या कर्करोगाच्या विरूद्ध लढण्यासाठी महिलांना मदत करण्यास आम्ही महत्त्वपूर्ण आणि सक्रिय भूमिका बजावत आहोत. देशभरात अधिक जागरूकता आणि कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या स्वस्थ, आनंदी आणि मजबूत भविष्यासाठी काम करीत आहोत"

स्तनांच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियामध्ये अद्ययावत असलेली सेन्टीनेल लिम्फ नोड बायोप्सी हि उपचार पद्धती उपलब्ध करून देणारे - अॅलेक्सिस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे मध्य भारतातील पहिले हॉस्पिटल आहे. या तंत्रज्ञानाद्वारे, निळ्या नोड्समध्ये रोगाचा प्रसार नसलेल्या रूग्णांसाठी संपूर्ण ऍक्सिलरी डिसेक्शन टाळता येऊ शकते. सेरॉमा आणि लिम्फोडेमासारखे प्रादुर्भाव सेन्टीनल लिम्फ नोड बायोप्सीद्वारे मोठ्या प्रमाणात कमी होतात.
विनामूल्य चेकअपसाठी नोंदणी करण्यासाठी, ७१२ ७१२ ०००० या क्रमांकावर कॉल करा किंवा pinkitnow.zulekhahvertising.com या संकेतस्थळाला ला भेट द्या आणि आपली भेट नियोजित करण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन डाउनलोड करा. 
अॅलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बद्दल - www.alexishospital.com: 

अॅलेक्सिस मल्टीस्पॅस्पिटली हॉस्पिटल हे झुलेखा हेल्थकेयर ग्रुप, युएई ची एक उपशाखा असून संपूर्ण मध्य भारतात उत्तम व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा सेवा देण्यास मदत करते. रुग्णालयात सुप्रसिद्ध तज्ञ आणि निष्णात वैद्यकीय कर्मचा-यांचा संघ असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेऊन त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा येथे प्रदान करण्यात येते. 
या अत्याधुनिक हॉस्पिटल मध्ये २१० बेड्सची सुविध असून अद्ययावत ओव्हर-टू-एंड मल्टीस्पेशालिटी सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. ऑन्कोलॉजी आणि रेडिओथेरेपी, कार्डियाक सायन्सेस, न्युरोसायन्सेस, ऑर्थोपेडिक्स, क्रिटिकल केअर, मिनिमल इनवेसिव सर्जरी, युरॉलॉजी, नेफ्रोलॉजी, गैस्ट्रोएंटरोलॉजी, एन्डोक्रिनोलॉजी, गायनोकॉलॉजी, पेडियॅट्रिक्स व निऑनॅटॉलॉजी,क्रिटिकल केअर (सीसीयू, आयसीयू, एनआयसीयू, एसआयसीयू) आणि अंतर्गत औषधे, जॉइंट रिप्लेसमेंट अॅण्ड अर्थोस्कोपी, ट्रॉमा सर्विसेस, इंटरव्हेन्शनल रेडियोलॉजी व प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन. सेंट्रल इंडियाची वैद्यकीय गरज लक्षात घेता अॅलेक्सिस मल्टिसस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक सुसज्ज व अद्ययावत अवयव प्रत्यारोपण युनिटची सुविधा देखील उपलब्ध असेल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.