Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०६, २०१८

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी


ऊपचारासाठी नागपूरला रवानगी


तालुका प्रतिनिधी/रामटेक
तालुक्यातील पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत मोगरकसा जंगलातील वनविकास वनविकास महामंडळाच्या वन कक्ष क्रमांक 440 मध्ये आपल्या घरच्या गायी-म्हशी चरायला घेवून गेले असतांना मौजा सालई येथील गुराखी दुलीचंद झिंगरु मेहर वय-५५ वर्षे यांच्यावर वाघाने हल्ला केला.या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत.ही घटना दिनांक ६ आगष्ट २०१८ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.याबाबत लगेच पवनीचे वनपरीक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके व त्यांच्या अधिनस्त अन्य वन्य कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले गंभीर जखमी मेहर यांना तात्काळ उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. डॉक्टर रहाटे यांच्या सेवन स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आसल्याचे किशोर कैलुके यांनी सांगितले. विशेष बाब अशी की वनविकास महामंडळाच्या याच कंपार्टमेंटमध्ये मागच्यावेळी मे महिन्यात जखमी वाघ आढळून आला होता.वन विभागाने बरेच प्रयत्न करूनही त्याला पकडण्यात यश आले नव्हते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.