Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २७, २०१८

नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन दीड महिना नागपुरात

नागराजच्या 'झुंड'साठी बिग बी दीड महिना नागपुरातनागपूर/ऑनलाईन काव्यशिल्प: 
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या आगामी सिनेमाच्या शूटिंगला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना विदर्भात तळ ठोकणार आहेत.

या सिनेमाचं 40 ते 45 दिवसांचं शूटिंग नागपुरात होणार आहे. नागपूरच्या सेंट जॉन शाळेच्या आवारात ह्या सिनेमाचा सेट उभारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना नागपुरात राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
'ठग्ज ऑफ हिंदुस्थान', कौन बनेगा करोडपती यासारखे प्रोजेक्ट संपल्यानंतर बिग बीनं आपल्या तारखा 'झुंड' सिनेमासाठी दिल्या आहेत.



चित्रपटाचा सेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून हटवल्यानंतर चित्रीकरण लांबणीवर पडलं होतं. त्यानंतर तारखांचा घोळ झाल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी सिनेमा सोडलाही होता. मात्र अखेर बिग बी पुन्हा सिनेमात काम करण्यास राजी झाले.(स्रोत:ABP )


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.