Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २७, २०१८

महावितरणतर्फ़े पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

नागपूर/प्रतिनिधी:
महावितरण नागपूर परीमंडळच्या विद्युत भवन प्रशासकीय इमारत येथे महावितरण आणि महानिर्मितीच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार (दि.25 सप्टेबर) रोजी त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले. 
यावेळी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला महानिर्मितीचे उपमुख्य अभियंता (टि आय सी) शांताराम पौनीकर, महावितरणचे महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री.शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) रुपेश देशमुख, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, तसेच महावितरण कार्यालयातील पुरुष व महिला अधिकारी/कर्मचारी तसेच महानिर्मितीचे महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सविता झरारीया, अधीक्षक अभियंता विजय बारंगे, श्रीराम बोरकर, कार्यकारी अभियंता सलीला कामत कार्यकारी अभियंता, कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ संजय बोकडे यांचेसमवेत नागपूर कोल कार्यालयातील पुरुष व महिला अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.