Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २७, २०१८

आजपासून घरघुती वापरातल्या १९ वस्तूंच्या किमती वाढल्या

एसी, फ्रीज,वाॅशिंग मशिनसह 19 वस्तू महागणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
बघा कोणत्या आहेत त्या वस्तू 

काव्यशिल्प/ऑनलाईन:
केंद्र सरकार मुख्य सीमा शुल्क वाढवून शुल्क मर्यादा केली आहे. 
एकूण 19 वस्तूंवर अबकारी वाढवलाय असं मंत्रालयाने स्पष्ट केलं.
एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन (10 किलो पेक्षा कमी) वर अबकारी कर 20 टक्काने वाढवलाय. हे दर 26-27 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.





तसंच कम्प्रेसर, स्पीकर आणि बुटांवरही अबकारी करवा क्रमश: 10, 15 आणि 25 टक्क्यांनी वाढवलाय.

रेडियल कार टायर वर 10 वरून 15 टक्के कर वाढवलाय. पॉलिश केलेले, सेमी प्रोसेस्ड आणि प्रयोगशाळेत तयार केलेले खडे यावर 5 वर 7.5 टक्के कर वाढवण्यात आलाय.

ज्वेलरी, सोनं, चांदीची भांड्यांवर 15 वरून 20 टक्के कर वाढवण्यात आला.

तसंच बाथरूमची उत्पादन पॅकिंग साहित्य, किचनच्या वस्तू, ऑफिस स्टेशनरी, सजावट करणाऱ्या शीट, बांगड्या, ट्रंक, सुटकेस आणि प्रवासी बॅकवर 10 ऐवजी 15 टक्के कर वाढवलाय.

तसंच सरकारने विमानाच्या इंधनावरही 5 टक्के कर वाढवलाय. आधी यावर कोणताही कर नव्हता. 
केंद्र सरकारने जेट इंधन, एअर कंडीशनर आणि रेफ्रिजरेटरसह 19 वस्तूंवर आयात कर वाढवला आहे.







SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.