Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट ०७, २०१८

चंद्रपुरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ललित लांजेवार:
चंद्रपुर शहरातील बल्लारपूर मार्गावर असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील हॉस्टेल मध्ये आज सायंकाळच्या सुमारास एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने विद्यार्थी व शैक्षणिक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली, प्रथमेश माळी असे विद्यार्थ्याचे नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी होता.  त्याच्या सोबत राहणाऱ्या काही विद्यार्थ्याने बाहेरून रूमचा दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा लगत असलेल्या खिडकीतुन बघितले असता प्रथमेश हा रूममधील पंख्याला गळफास लावून लटकून दिसला.या घटनेची माहिती महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आली.त्यानंतर लगेच रामनगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत शव पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून प्रथमेश ने आत्महत्या कोणत्या कारणावरून केली त्याच्या आत्महत्येला  जबाबदार कोण? याचा पुढील तपास रामनगर पोलिस स्टेशनचे PSI मनीष दुबे व  कांस्टेबल पुरूषोत्तम गीते करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.