Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ०८, २०१८

क्रांती ठोक मोर्चा आणि आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद


नागपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या ९ आॅगस्टच्या क्रांती ठोक मोर्चा आणि आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी शहराच्या विविध भागात फिरून दुकाने बंद केली. त्यामुळे सीताबर्डी, महाल, इतवारी, गांधीबाग, मस्कासाथ, सक्करदरा या भागातील बाजारपेठा बंद होत्या. शिवाय शहर बस बंद असल्यामुळे प्रवाशांना फटका बसला. नागरिकांनी स्वेच्छेनेच आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. शाळा महाविद्यालयांना संस्थाचालकांनी सुरक्षिततेची बाब लक्षात घेत, सुटी दिली आहे.
नागपूर शहरात आंदोलकांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. भगवे फेटे घातलेले शेकडो आंदोलक महाल भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याला माल्यार्पण करण्यासाठी जमले होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.