Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट ०४, २०१८

आता ग्राहकांना मिळणार वेळेत व अचूक वीजबील

महावितरणकडून केंद्रीयपध्दतीने बिलींग, छपाई व वितरण
देशात प्रथमच नाविन्यपूर्णप्रयोग
नागपूर/प्रतिनिधी:
राज्यातील अडीच कोटीपेक्षाअधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूकवीजबील मिळावे तसेच ग्राहकांनावीजबील भरण्यासाठी अधिककालावधी मिळावा या करिता महावितरणच्यावतीने वीज बिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावरकरण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरूवात झाली आहे. देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पध्दतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहक सेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांना प्रॉम्ट पेंमेंट डिस्कॉऊंटचा लाभ घेता येईल. 
महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीज बिलांची छपाई व ते ग्राहकांपर्यन्त पोहोचण्यासाठी साधारणत: ७ ते ८दिवसांचा अवधी लागतो. ग्राहकांना वेळेत वीजबील न मिळाल्यामुळे त्वरीतदेयक प्रदान दिनांक अंतर्गत मिळणारीसूट (प्रॉम्टपेमेंट डिस्काऊंट) मिळण्यास ग्राहकांना अडचणी येत होत्या.याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीजबिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर संनियंत्रण ठेवणे कठीण जात होते.
या सर्व बाबींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठीमहावितरणच्यावतीने केंद्रीय पध्दतीनेवीजबिलाची छपाई व वितरण करण्यातयेणार आहे. मोबाईल मीटर रिडिंगॲपमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाईम)मीटरवाचन तसेच चेक रिडिंग उपलब्धहोत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलदव दैनंदिन पध्दतीने बिलावरची संपूर्णप्रक्रिया करण्यात येणार आहे. याप्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्तअचूक वीजदेयक मिळेल तसेच त्यांनावीजदेयक भरण्यासाठी अधिकचाकालावधी मिळाल्यामुळे वीजदेयकभरणा केंद्रातील रांगा कमी होतील वदेयक भरणे अधिक सोयीचे होईल.
मुख्यालयातील सर्व्हरवर बीलतयार करण्यात येणार असून हे बीलपरिमंडलस्तरावर वीजबीलवितरणासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्याएजन्सीकडे २४ तासांत पाठविण्यातयेईल. त्यानंतर या एजन्सीकडून सदरवीजबील शहरी भागात ४८ तासातआणि ग्रामीण भागात ७२ तासांतवितरीत करण्यात येईल्. दिलेल्यामुदतीत ग्राहकांना वीजबील न देणाऱ्याएजन्सींना दंड आकरण्यात येईल.त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना वेळेत वीजबील मिळून प्रॉम्ट पेंमेंट डिस्कॉऊंटचा लाभ घेता येईल. 
या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ, वसुली कार्यक्षमतेत वाढ व थकबाकी तसेचवाणिज्यिक हानीत घट, उपलब्धमनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, बिलींग,छपाई व वितरण्‍ खर्चात मोठी बचत,संपूर्ण व्यवस्थेवर केंद्रीयस्तरावरूननियंत्रण, बिलींग तक्रारीच्या प्रमाणातघट व संपूर्ण बिलींग व्यवस्थेवर माहितीतंत्रज्ञानाच्या सहाय्याने संनियंत्रणइत्यादी लाभ होणार असून त्या सर्वांचाफायदा ग्राहकांना होईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.