Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ०५, २०१८

सापाने केली बत्ती गुल;लाईनमॅनने साप हटवून वीजपुरवठा केला पूर्ववत

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शुक्रवारी नवरगाव शाखा कार्यालयांतर्गत येणाऱ्या अंतरगाव गावास वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रावरील डबलपोल स्टभक्चरच्या वीजवाहिनीच्या पोलवर दुपारी ४ वाजताच्या सुमारास साप चढला,हा साप चढल्याने गावातील शेकडो घरातील बत्ती गुल झाली.मात्र आता महावितरणच्या कर्मचार्यांना आव्हाहन होते ते पोलवरून या सापाला बाजूने करायचे,अश्यातच महावितरणचे कर्मचारी लाईनमॅन प्रदिप उगे यांनी खांबावर चढून काठीच्या सहाय्याने त्या सापास बाजूला सारत तब्बल तासभराच्या परिश्रमानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला,साप म्हटल कि चांगल्या चांगल्यांची घाबरगुंडी होते मात्र ज्या ठिकाणी साप त्या ठिकाणीच माणसाने जाणे म्हणजे सापाच्या बिळात हात घातल्या सारखेच म्हणावे लागेल.
हा साप काढतांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. सापाने हालचाल केली नाही म्हणून लाईनमॅनला साप काढण्यात जास्त दमछाक करावी लागली नाही मात्र अश्या परीस्थित धोका होवू शकण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही, लाईनमॅनने केलेल्या या कामाची चांगलीच विभागात व गावात प्रशंसा होत आहे.
महावितरणचे कर्मचारी अभियंते रात्री अपरात्री, उन, वारा, पावसात काम करून प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असतात. वीजदुरूस्तीची काम करतांना विदयुत अपघाताचा धोका तर असतो परंतु अनेक परिस्थिती अशाही उद्भवतात की जेथे शारीरिक इजा व प्रसंगी जीवावर बेतते. रानटी पशु , साप, विंचू या सारखे सरपटणारे तर कधी रानडुक्कर, वाघ, बिबटे अशा प्राण्यांच्या भितीतही काम करून वीजपुरवठा पूर्ववत करावा लागतो. त्याच प्राण्यांमुळे एकीकडे वीजपुरवठा खंडित होवून अंधार झाल्याने ग्रामस्थांना धोका असतो तर नेमके त्याचवेळी त्याच प्राण्यांमुळे वीजदुरूस्ती करणाऱ्या महावितरणच्या अभियंता व जनमित्रांना धोका असतो. परंतु वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे कर्तव्य जनमित्र व अभियंते पार पाडत असतात.
असाच धोका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी २० व २१ जून रोजी पत्करला होता,वादळ वाऱ्यासोबतच्या पावसात घनदाट जंगलात पिन इंसुलेटर्स व विदयुत वाहिनीवर वीज पडली अन हजारो घरांची बत्ती गुल झाली होती, या हि परिस्थितीत अथक परिश्रमानंतर कर्मचार्यांना वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.