Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ३१, २०१८

वीज ग्राहकांसाठी खुशखबरी;आता वीज बिलाचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना अनेक पर्याय

नागपूर/प्रतिनिधी:
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फ़े संपुर्ण राज्यात आक्रमकतेने राबविली जात असून येणा-या सुट्ट्यांचा काळ बघता वीजबिलाचा भरणा कसा करायचा असा यक्षप्रश्न अनेक वीज ग्राहकांना भेडसावत असला तरी बिलांचा भरणा सुलभतेने व्हावा म्हणून ग्राहकांना मोबाईल ॲप आणि संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने शिवाय अनेक सहकारी बॅंका, महावितरण आणि खासगी वीजबिल भरणा केंद्रांतून विजेचे बिल भरण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली असल्याने ग्राहकांनी नियमितपणे वीजबिलांचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.
महावितरणच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून (www.mahadiscom.in) किवा महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे ग्राहक विजेचे बिल ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. क्रेडिट कार्डद्वारे बिलाचा भरणा केल्यास शुल्क आकारण्यात येत असून. उर्वरित इतर सर्व पद्धतींच्या माध्यमातून (नेटबँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) वीज बिलाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाइलवर 'एसएमएस'द्वारे त्वरित पोच मिळते; महावितरणच्या या संकेतस्थळावर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास वीजबिल भरल्याचा तपशील व पावतीही उपलब्ध होते. ऑनलाइन वीजबील भरणा पद्धत अत्यंत सुरक्षित असून, यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधू शकतात. 
एसएमएस दाखवूनही वीजबिलाचा भरणा शक्य
अनेकदा वीजबिल मिळालेच नसल्याची किंवा उशीरा मिळाल्याची ग्राहकांकडून होणारी ओरड लक्षात घेता वीजबिल तयार होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्यासंबंधीचा एसएमएस पाठविण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली असून हा एसएमएस वीजबिल भरणा केंद्रावर दाखवून त्याअनुषंगाने वीजबिलाचा भरणा करता येणे शक्य असल्याने आता ग्राहकाला त्याच्या वीजबिलाची वाट बघत बसण्याएवजी महावितरणकडे केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्यास येणा-या एसएमएसच्या आधारे त्याला त्याच्या वीजबिलांचा भरणा वेळीच करणे शक्य झाले आहे. याशिवाय ठाराविक मुदतीत पैसे भरून विजबिलात मिळत असलेल्या प्रॉम्प्ट पेमेंट सवलतीचा लाभ घेणेही शक्य झाले आहे.
कृषी वर्गवारीचे ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीच्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा नियमितपणे वीजदेयके दिली जातात, मात्र काही कारणास्तव ग्राहकाला वीज बिल उपलब्ध न झाल्यास ग्राहकाने संबधित उपविभागीय कार्यालयामध्ये वा शहरी भागामध्ये मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र येथे ग्राहक क्रमांक दिल्यानंतर तात्काळ वीज देयकाची दुसरी प्रत त्यांना तात्काळ मिळेल, याशिवाय ज्या ग्राहकांकडे मोबाईल ॲप नाही त्यांच्याकरिता महावितरणच्या वीजबिलावर ‘क्युआर’ (क्यूक रिसापॉन्स) कोड देण्यात आला असून मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाउनलोड केलेल्या क्‍यूआर कोड रीडरच्या माध्यमातून वीजबिलावरील हा कोड स्कॅन करता येतो. त्यावरून महावितरणची मोबाईल ॲपची लिंकही मिळते. वीजबिलावरील क्‍यूआर कोड हा अँड्राइड, आयओएस, विंडोज मोबाईलसाठी उपलब्ध आहे. सोबतच राज्यातील अनेक भागात प्रायोगित्क स्तरावर फ़िरते वीज बील भरणा केंद्रही सुरु करण्यात आले असून साप्ताहिक बाजाराचे दिवशी या केंद्रावर जाऊन ग्राहकांना त्यांचे वीजबिल भरणा करणे शक्य आहे.
ग्राहकांनी वीज बिलभरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहून बील भरण्यापेक्षा महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या नि:शुल्क ऑनलाइन सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.