Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २५, २०१८

६०० पेटी दारू तस्करीतील मुख्य आरोपी गजाआड

Image result for दारू पेट्या
संग्रहित छायाचित्र 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्हयात दारूबंदी घोषित झाल्यापासुन पोलीस विभाग अवैध दारू तस्करांना वेठीस आणण्याकरीता अहोरात्र प्रयत्न करीत आहे. दिनांक 15/07/2018 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन नागभिड अंतर्गत दोन ठिकाणी अवैध दारू तस्करी बाबत कार्यवाही करीत दारू तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकुण 559 पेटी व 1000 देशी विदेशी दारूच्या निपा किंमत 76,08,670/-रू चा मुद्देमाल जप्त केला होता. सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन नागभिड येथे नोंद करण्यात आला होता. 
सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे श्रीनिवास कोलावार रा. पवनी जि. भंडारा हा गुन्हा दाखल झाल्यापासुन पसार होता.स्थागुशा पथक त्याची सतत गोपनीय माहिती काढुन त्याचा पाठलाग करीत होते. आज दिनांक 25/08/2018 रोजी मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थागुशा पथक पवनी भंडारा  येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून स्थागुशा पथकाने सापळा रचुन त्यास पवनी जि. भंडारा येथुन अटक केली.श्रीनिवास कोलावार हा स्वतःच्या भट्टीत दारू तयार करीत असुन त्याच्याकडे दारू विक्रीचे दाेन परवाने त्याद्वारे तो  भंडारा जिल्हयातुन ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभिड आणि चिमुर या परिसरात माेठया प्रमाणात अवैध रित्या दारूचा पुरवठा करीत हाेता. यापरिसरातील सदर आराेपी हा मुख्य पुरवठादार आणि चंद्रपुर जिल्हयातील नाेंद गुन्हयातील फरार आराेपी असल्याने पाेलीस पथक याचे सतत मागावर हाेते.
सदर गुन्हयाचा तपास श्री. महेश्वर रेड्डी,पोलीस अधीक्षक चंद्रपुर, श्री. हेमराजसिंह राजपूत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्ग दर्शनात  स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोनिसुधाकर अंभोरे यांचे नेतृत्वात पोउपनि जितंेद्र वैरागडे, पोहवा संगीडवार, पोशी अविनाश दशमवार, अमजद, संदीप मुळे, मयुर येरमे यांनी पार पाडली. सदर आरोपीस पुढिल तपासाकरीता नागभिड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.