Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट २४, २०१८

वर्ध्यात`बच्चा`चा खून; शौचालयाच्या टाक्यात आढळला मृतदेह

वर्धा/ विशेष प्रतिनिधी:

वर्धा येथील पुलफैल येथे राहणारा अट्टल गुन्हेगार `बच्चा` उर्फ मिलिंद सुभाष मेश्राम (वय ५१) याचा शुक्रवारी रात्री धारधार शत्राने वार करून त्याच्याच घरी खून करण्यात आला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरासमोरील शौचालयाच्या टाक्यातील पाण्यात टाकलेला आढळून आला .
पोलिसांनी या प्रकरणात संशयित म्हणून चार जणांना ताब्यात घेतले असून यात त्याच्या सावत्र मुलीचाही समावेश आहे.विशेष म्हणजे त्याच्या सावत्र मुलीनेच मृतदेह शौचालयाच्या टाकीतील पाण्यात असल्याचे सर्वांना सांगितले.
याशिवाय आरोपी बच्चाचे दोन दात पडले असल्याचे तपासात पुढे "बच्चा" मेश्राम याच्या शरीरावर तब्बल २५ हून अधिक घाव असल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच खुनाच्या वेळी त्याचा गळा चिरल्याचे दिसत होते.छातीवरही
शत्राचे वार होते. यावरून त्याचा अत्यंत निघृणपणे खून केल्याचे स्पष्ट दिसत होते.
बच्चा उर्फ मिलिंद मेश्राम हा वर्धा येथील रेल्वेगाडीत चहा विक्रीचे काम करायचा. बच्चा या टोपण नावानेच त्याची ओळख होती.तो विशाखापट्टणम येथील कारागृहात १८ महिने बंदिस्त होता. दरम्यान या काळात त्याच्या पत्नीचे निधन झाले होत, तो महिन्यापूर्वीच तो वर्ध्यात परतला होता.मुली सोबतही मिलिंदचा नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे ती नातेवाईकांच्या घरी राहायची. कालही तिचे वडिलांसोबत भांडण झाले होते. त्यामुळे ती गुरुवारीच नातेवाईकांकडे राहायला निघून गेली होती.पहाटे ती घरी आली तेव्हा तिला वडील घरी दिसले नाही.मात्र सर्वत्र रक्त व शितोडे दिसून आले. याच सोबत तेथे २ दात पडून असल्याचे दिसले.तिने सर्वत्र शोध घेतला,शोध घेत असतांना ती घरासमोरील शौचालयाच्या टाक्याजवळ गेली असता तिला वडिलांचा मृतदेह टाक्यात दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस श्वानपथकाश दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे, ठाणेदार चंद्रकांत मदने सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.व मृतदेह शवचिकित्सेकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.