Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २५, २०१८

पवणार व वरुडच्या विकासाला मिळणार गती

आ.पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने १७ कोटी मंजूर
वर्धा/प्रतिनिधी:
वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम व पवनार या दोन विशेष ओळख असणाऱ्या गावांना जोडणाऱ्या वरुड आणि पवनार गावच्या विकासाला आता  गती मिळणार आहे. आ. डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत तब्ब्ल १७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीकरिता शिखर समितीच्या बैठकीत अंतिम मंजुरी दिली आहे. या मंजुरी नंतर आमदार डॉ. पंकज भोयर यांचे दोन्ही ग्रामपंचायतच्या सरपंच व नागरिकांनी आभार मानले.
आ. डॉ. पंकज भोयर यांनी पालक मंत्री तथा राज्याचे वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १ जाने २०१७ रोजी पत्र देऊन पवनार व वरुड गावाच्या अंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करण्याकरिता दोन्ही गावांसाठी प्रत्येकी १० कोटी रुपयांची मागणी केली होती. 
राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून वरुड येथे १० कोटी रुपयांची तर पवनार येथे ७ कोटी रुपयांची विकास कामे होणार आहे. निधीतून दोन्ही गावातील ग्रंथालय, सार्वजनिक खुल्या जागांचे सौंदर्यीकरण, नाला व नाली बांधकाम, हायमास्ट,अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण, सांडपाणी, जलशुद्धीकरण, सौरउजा संच, यासह आदी काम होणार आहे. 
शुक्रवारी २४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे शिखर समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव जलसंपदा विभाग, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त नागपूर, व जिल्हाधिकारी वर्धा ,अपर मुख्य सचिव, अपर सचिव (उद्योग),प्रधान सचिव सा. ब. विभाग, प्रधान सचिव (ऊर्जा), प्रधान सचिव (जलसंपदा), आदी उपस्थित होते. वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी त्वरित अप्पर मुख्य सचिव यांना त्वरित निधी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते.
या गावांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे पवनारचे सरपंच अजय गोंडोळे, वारुडचे सरपंच वासुदेवराव देवडे, वर्धा प.स. सभापती महानंदाताई ताकसांडे, जी.प. च्या माजी सदस्या सुनीताताई ढवळे व ग्रा.प. सदस्य सुनील फरताडे, प्रमोद राऊत, अरुणसिंग निमरोट, अशोकराव भट, बाळशीराम मनोले,ज्योत्सनाताई गवळी, शुभांगीताई हिवरे, अरुणाताई काकडे, लखनभाई आशिष ताकसांडे शंकरराव वाघमारे, नंदाताई उमाटे, अर्चनाताई डगवार, वर्षाताई बांगडे,जयश्रीताई मेहर, पुष्पाताई बोकडे,व नागरिक केला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.