Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट २९, २०१८

चंद्रपुरात शाळेतील वाद पोहचला पोलीस ठाण्यात

मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल 
ललित लांजेवार:
हि बातमी शिक्षक वर्गात खळबळ माजविणारी बातमी आहे.चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात असलेल्या एका उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग शिकवणीच्या कारणावरून झालेल्या वादाला भलतेच वळण मिळाले आहे, अन हा वाद पोलीस ठाण्यात पोहचला आहे.
शहरातील लालपेठ परिसरातील प्रगती एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित सूरज हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याधापकावर महिला शिक्षिकेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील सूरज हिंदी उच्च प्राथमिक शाळेत कुणाल(बदललेले नाव) हे गेल्या १५ वर्षाहून अधिक वर्षापासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत,याच शाळेत मोनाली(बदललेले नाव) ह्या सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे,या शाळेतील ८ शिक्षक शिक्षिकेचा स्टाफ या मुख्याध्यापकांकडे आहे. अश्यातच मुख्याध्यापकाने वारंवार माझ्या वर्गाकडे नजर ठेवत मला वारंवार शिवणीचा लेखाझोका मागवीत असतात व अश्यातच गेल्या काही दिवसांपासून मला मानसिक व शारीरिक छळ होत आहे, असा आरोप करत महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,महिला शिक्षिकेच्या बयाणावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार मी माझ्या मुख्याध्यापकाचे कार्य व्यवस्तीत रित्या पार पाडतो मात्र शिक्षक त्यांचे शिकवणीचे कार्य पार पडत नाही,शासन त्यांना पगार देतो व त्यांच्या कामाचा लेखाजोखा घेणे माझी जिम्मेदारी आहे. तक्रारदार महिला शिक्षिका ह्यांच्या वर्गावर मी विद्यार्थ्यांची शिकवणी वर्गात गेल्यावर तपासणी केली असता विध्यार्थ्यांना वाचता लिहिता येत नाही, गणितातले गुणाकार भागाकार येत नाही व त्यामुळे मी त्यांच्या वर्गावर जाऊन विध्यार्थ्यांना विचारपूस केली.व रोजनिशी वही मागविली असता त्या संतापल्या व त्यांनी मला अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.असे सांगितले. 
या संपूर्ण प्रकरणात मुख्याध्यापकावर कलम ३५४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिक्षिकेवर अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कलम २९४,५०६ नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील पुढील  तपास शहर पोलीस करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.