Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २८, २०१८

लिंगा मांडवी येथे वृक्षारोपण

प्रतिनिधी/कारंजा:उमेश तिवारी:
तनिष्का ग्रामीण विकास संस्था लिंगा मांडावी वर्धा व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने लिंगा मांडवी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या रोपवाटीकेतील रोपांची लागवड करण्यात आली, 
याप्रसंगी गावचे जेष्ठ समाजसेवक श्री गोपाल घाडगे, तनिष्का संस्थेचे अध्यक्ष गजानन ढोबाळे, पाणी फाउंडेशनचे समन्वयक चंद्रशेखर डोईफोडे, शिल्पा अडसड श्री सोहमनाथ विद्या मंदिर उमरी चे मुख्यापक राम घोडे, युवराज किनकर शिक्षक, राजू रहाटे, वनविभागाचे अंबादास हिंगवे उपस्थित होते.तसेच श्री सोहमनाथ विद्या मंदिर उमरी शाळेतील विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोशन वरठी, चेतन घागरे, ऋषीकेष घाडगे, यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन राधेश्याम ढोबाळे तर आभार अरूण देशमुख यांनी मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.