Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २८, २०१८

चिमुर उपजिल्हा रुग्णालयात दोन गरोदर मातांंच्या झाल्या यशस्वी सिझरीयन शस्त्रक्रिया

डॉ.देवयानी कामडी-येरणे यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
चिमूर/प्रतिनिधी:
          चिमूर क्रांंतीकरी भूमीत दि २८ जुलै २०१८ रोजी प्रथमच  गरोदर मातावर सीझरयिन शस्त्रक्रिया करून डिलव्हरी करण्यात आली  या ऐतिहासिक प्रसंगा मध्ये शस्त्र क्रिया करणाऱ्या डॉ.देवयानी कामडी यांनी सदर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या  पूर्ण केलीं त्या करीता बंधीरीकरन तज्ञ डॉ.प्रीती सावजी यांनी बधिरीकरणाची जोखीमीची सेवा देऊन सहकार्य केले.
  चिमूर दुर्गम परिसरात सिझरीयची सेवा उपलब्ध होणे म्हणजे प्रसशणीय बाब असून जोखमीच्या पातळीवरील सर्व गरोदर मातांना आशेचा किरण असा आहे. या परिसरातील अनेक गरोदर मातांना सिझेरियनची गरज असलेल्या सेवेकरिता चिमूर पासून ११० किमी च्या अंतरावरील नागपूर आणि चंद्रपूरला जावे लागत असताना सामान्य जनतेला आर्थिक फटका बसत होता. त्यात अनेकदा महिलांना मृत्यू ला सामोरे जावे लागत असे परंतु भाजप शासनाने उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय अश्या ठिकाणी स्त्रीरोग तज्ञाना केवळ मानधनावर नियुक्त करून सिझरीयनची सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे चिमूर सारख्या दुर्गम भागात हि महत्वाची सेवा सुरू झाली आहे.
 चिमूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया  करिता उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक डॉ गोपाल भगत ,डॉ अश्विन अगडे, डॉ देवयानी कांमडी ,डॉ प्रीती सावजी ,व कर्मचारी वृद च्या मोलाचे  सहकार्य केले 
  दरम्यान ऐतिहासिक घटनेची नोंद घेत भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर यांनी चिमूर क्रांती हॉस्पिटल चिमूर येथे सिझरीयनची यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ देवयानी कांमडी व डॉ प्रीती सावजी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला असता भाजप महिला आघाडीच्या वर्षा दिलीप शिवरकर यांनी डॉ.देवयानी कांमडी व डॉ.प्रीती सावजी यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर , पत्रकार रामदास हेमके ,भाजप तालुका महामंत्री विनोद अढाल ,सुहर्ष महा कुलकर,स्वाती मोहिणकर,वर्षा वाघमारे,यशोदा कनाके उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.