Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै २६, २०१८

वीज चोरी करणे पडले महागात;आता खात आहेत जेलची हवा

जेलची हवा साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
वीज चोरीचा गुन्हा सिद्ध झाल्याने ३ आरोपींना दारव्हा न्यायालायने तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
दारव्हा तालुक्यातील उमरी इजरा गावात राहणारे  धनु राठोड ,राजू राठोड, प्रह्लाद पवार अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. महावितरणचे शाखा अभियंता गौतम भागवत यांनी ३१ मे २०१८ रोजी यांनी वरील आरोपींना वीज चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. आरोपींच्या विरोधात भारतीय विदुयत कायद्यानुसार गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास करून सदर प्रकरण  दारव्हा न्यायालयात न्यायप्रविष्ट करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यालयाने ५ साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश अ. के.  लाहोटी यांनी ३ महिने कारावास आणि ३ हजार रुपयाने दंडाची  शिक्षा आरोपींना सुनावली. या खटल्यात सरकारकडून अंकुश देशमुख यांनी बाजू मांडली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.