Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २८, २०१८

अ‍ॅग्रोव्हिजनच्या दशकपूर्तीला पंतप्रधान नागपूरला येणार

उद्घाटन सोहळा होणार भव्यदिव्य
कृषीमंत्र्यांसह चार राज्यांचे मुख्यमंत्री अतिथी
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची पत्रपरिषदेत माहिती

    नागपूर/प्रतिनिधी:
    येत्या २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान आयोजित अ‍ॅग्रोव्हिजनच्या दशकपूर्ती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहणार आहे़ यंदा भव्यदिव्य स्वरुपात होणाºया सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पूर्वेकडील राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अ‍ॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रपरिषदेत दिली़
    विदर्भातील शेतकºयांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्यासाठी हे कृषी प्रदर्शन भरविण्यात येते़ कार्यशाळा, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अध्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषीविषयक ताज्या विषयावरील चर्चासत्रे, विदर्भाच्या शेतीला नवी दिशा देणाºया परिषदांसह पशूप्रदर्शन, अ‍ॅग्रीथॉन हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य राहणार आहे़ , बळीराजाच्या गौरवाचा अ‍ॅग्रोव्हिजन अवॉर्ड सोहळा हे यंदाचे खास वैशिष्ट्य आहे़ दशकपूर्तीनिमित्त शेतीत उल्लेखनीय कार्य व योगदान देणाºया शेकºयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे़ सन्मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहील़ तज्ज्ञांच्या निवड समितीमाफर् त पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
    10 वे अॅग्रोव्हिजन, मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन
    शेती क्षेत्राच्या बाबतीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राष्ट्र आहे. मसाले, कडधान्ये, दुध, चहा, काजू व ज्युटचे जगात सर्वाधिक उत्पादन भारतात होते. गहू, भात, फळे व भाजीपाला, ऊस, कापूस व तेलबिया उत्पादनात आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. पुढील चार वर्षात 2022 पर्यंत देशाच्या शेती उत्पन्नात दुपटीने वाढ होणे अपेक्षित आहे. शेतीसाठीच्या पायाभूत सुविधांमधील वाढलेल्या गुंतवणूकीमुळे येत्या काही वर्षात देशाच्या कृषी क्षेत्राची स्थिती वेगाने बदलणे अपेक्षित आहे. अशा स्थितीतही अत्याधुनिक शास्रिय पद्धतींच्या वापराचा अभाव आणि आधुनिक यंत्र अवजारांची अनुपलब्धता हे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासातला प्रमुख अडथळे ठरत आहेत. केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. नितिन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना प्रोत्साहित, प्रशिक्षित व सबळ करणारी अॅग्रोव्हिजन नावाची ही चळवळ काही वर्षांपूर्वी सुरु झाली. अॅग्रोव्हिजनने आपल्या गेल्या नऊ वर्षांच्या योगदानातून शेतकऱ्यांप्रती समर्पित वाटचालीचा नवा प्रवाह प्रस्थापित केला आहे.
    अॅग्रोव्हिजन हा शेतकऱ्यांसाठीच्या मोफत कार्यशाळा, प्रदर्शन व चर्चासत्रे यांचा अनोखा संगम आहे. शेतकरी व कृषी उद्योगांना अगणित संधी उपलब्ध करुन देणारे ते मध्य भारतातील सर्वात सर्वोत्कृष्ट व्यासपिठ आहे. चार दिवस चालणाऱ्या कृषी ज्ञान तंत्रज्ञान प्रसार व परिवर्तनाच्या या महोत्सवात देशाच्या सर्व भागातून शेतकरी सहभागी होतात. वर्षागणिक अॅग्रोव्हिजनचा आकार व त्याचा शेतकरी आणि संलग्न घटकांच्या जीवनातील प्रभाव वाढत असून अल्पावधितच ते भारतातील कृषी तंत्रज्ञान प्रसाराचा सर्वात मोठा महोत्सव होण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल करत आहे. अॅग्रोव्हिजनचे 10 वे पर्व... 10 वे अॅग्रोव्हिजन येत्या 23 ते 26 नोव्हेंबर 2018 दरम्यान, नागपूर (महाराष्ट्र) येथे आयोजित करण्यात आले आहे.

    SHARE THIS

    Author:

    खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.