नागपूर/प्रतिनिधी:
वृक्ष लागवड मोहिमेचे लघुपट, माहितीपट, व्हिडीओ क्लिप तसेच वृक्षारोपणाबाबत तयार केलेल्या चित्रफित प्रत्येक नागरिकांना पाहता यावी, यासाठी वन विभागाच्या वतीने यु-ट्यूब या संकेतस्थळावर ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल सुरु केले आहे.
शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत 13 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम सुरु करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिक हरित महाराष्ट्र चळवळीत सहभागी होऊन वनसंपदा वाढविण्यास सहकार्य करीत आहे. व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची माहिती जनमाणसापर्यत पोहोचविण्यासाठी वनविभागाव्दारे ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल सुरु केले आहे.www.mahaforest.nic.in या संकेत स्थळावर नागरिक राज्यातील विविध भागात होत असलेल्या वृक्ष लागवड अभियानाची माहिती घेऊ शकतील.
हरित महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती वृक्षारोपणासंबंधी लघुचित्रपट, माहितीपट,व्हिडीओgreentube.mfd@gmail.com या मेलव्दारे गुगल ड्राईव्हवर पाठवू शकतात. नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अपर आयुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.