गेल्या देान वर्षात लावलेली झाडे देत आहेत सावली
राज्य हरीत करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून महावितरण चंद्रपूर परिमंडळात सर्वत्र वृक्षारोपण करण्यात येत असून दिंनाक 11 जुलै रोजी मुल विभागाअंतर्गत चिरोली उपकेंद्रात मुख्य अभियंता श्री.अरविंद भादिकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. अशोक म्हस्के, चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाष कुरेकार, सहा. महाव्यवस्थापक श्री. महेष बुरंगे, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी श्री. सुशिल विखार तसेच महावितरण कर्मचारी कला व जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे, क्रिडा मंडळाचे श्री. विजय चावरे, भालचंद्र घोडमारे, बंडू कुरेकार, अमित बिरमवार, ललित निमकर, शिल्पा गौरी व रोहिणी ठाकरे उपस्थित होते. मुख्य अभियंता श्री. अरविंद भादिकर यंानी चिरोली उपकेंद्राची पाहणी केली व उपकेंद्र सुस्थितीत ठेवण्यासंबंधी व्यवस्थित देखभाल करण्याच्या तसेच लावण्यात आलेल्या रोपटयंाची काळजी घेण्याच्या सुचना केल्या.
महावितरण चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारशाह , ब्रम्हपुरी, आलापल्ली, गडचिरोली या विभागातंर्गत उपकेंद्रात तसेच सर्व कार्यालय परिसरात 2016 व 2017 या वर्शात एकंदरीत 4623 तर यावर्षी आतापर्यंत 770 अशी एकंदरीत 5393 झाडे लावण्यात आली आहेत. महावितरणद्वारा लावण्यात आलेल्या अनेक झाडांनी आता सावली देणे सुरू केले आहे.