रामटेक ( तालूका प्रतिनिधी )
आज दिनांक १८ जुलै रोजी नगरपरिषद तर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये शहरातील बेघर व कच्च्या घर असलेल्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने हजेरी लावली या कार्यशाळेमध्ये सर्वप्रथम मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सदर योजनेच्या विशेष बाबींवर मार्गदर्शन करून या योजनेअंतर्गत एकूण चार घटका अंतर्गत बेघरांना घरे कशापद्धतीने देते याबाबत मागदर्शन केले .या योजनेअंतर्गत बेघरांना घरे, जागा मालकाना घरे, कर्जस्वरूपात मिळणारे अनुदान तसेच खाजगी विकासकाद्वारे बांधकाम करून तयार करण्यात येणारे घर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .या कार्यशाळेत शासनातर्फे नियुक्त केलेली एजन्सी केपीएमजी कडून सुद्धा कागदपत्रांबाबत मार्गदर्शन तांच्या प्रतीनिधि कडून करण्यात आले .या योजनेशी संबंधित असलेल्या शंका साधनांबाबत नगरसेकांनी व नागरिकांनी प्रश्न विचारून केपीएमजीकडुन शंकेचे समाधान करून घेतले.
सदर कार्यक्रमात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते तसेच श्री प्रभाकर खेडकर उपाध्यक्ष नप रामटेक व सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित होते.