Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०७, २०१८

ताडोबातील काळ्या बिबट्याची दुसरी झलक सोशल मीडियावर व्हायरल

नागपूर/ललित लांजेवार:
ताडोबा अभयारण्यातील कोळसा वनपरिक्षेत्रात बुधवारी पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचे  दर्शन झाले आहे.
मंगळवारी २२/०५/२०१८ रोजी बेल्जीयमचे पर्यटक जीन फ्रँकॉईस आणि ज्युलिएट हे ताडोबा भ्रमंतीसाठी आले होते,जंगलात सफारी सुरु असतांना त्यांना कोळसा वन परिक्षेत्रात शिवणझरी पाणवठ्यापाशी काळ्या बिबट्याने दर्शन दिले होते.त्या नंतर प्रसार माध्यमात या काळ्या बिबट्याची चांगलीच चर्चा रंगली होती.तेव्हा पासून ठीक 15 दिवसांनी परत या बिबट्याने पर्यटकांना दर्शन दिले आहे. श्वेताकुमार रंगाराव बोब्बीली नावाचे जंगलप्रेमी हे कोळसा वनपरिक्षेत्रात जंगल भ्रमंती करत असताना त्याच परिसरात हा काळा बिबट पुन्हा एकदा दिसून आला आहे. 15 दिवस अगोदरच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बिबट्याचा रंग हा

पूर्ण काळा दिसून आला होता मात्र श्वेतकुमार यांनी टिपलेल्या छायाचित्रात या बिबट्याचा रंग हा गर्द काळा नसून त्याच्या अंगावर सामान्य बिबट्याच्या कातळीवरचे ठिपके दिसून येत आहेत.२०१४ साली ताडोबात काळा बिबट बछडा आढळल्याची नोंद आहे. मात्र त्या नंतर तब्बल ४ वर्ष नंतर या बिबट्याचे ताडोब्याच्या या जंगलात दर्शन दिले.त्यानंतर 15 दिवसाच्या अंतरावर पुन्हा एकदा या सेलिब्रिटी बिबट्याने आपले वेगळ्या अंदाजात झलक दिली आहे .त्यामुळे वन्य प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसून कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता नेहमीचे ठिपके दिसतात.
शिवणझरी भागात पाणवठ्यावर मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हा दुर्मिळ आढळणारा काळा बिबट Black Panther पुन्हा याच ठिकाणी येण्याची शक्यता लक्षात घेत वनविभागाकडून या भागात आणखी कॅमेरा ट्रॅप लावले आहे मात्र हा बिबट वनविभागाच्या कॅमेऱ्यात न येता हौशी पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे,

निसर्गात रंगसंगतीला, त्यातही सरूपतेला (कॅमाफ्लॉज) अत्यंत महत्त्व असते. काळ्या बिबट्याला हा रंग फायद्याचा ठरतो. तिन्हीसांजा किंवा रात्रीच्या वेळी शिकार करणाऱ्या या प्राण्याला काळ्या रंगामुळे फायदाच होतो. अंधारात एकरूप होणाऱ्या रंगामुळे बिबट्या दिसणे कठीण होते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात तसेच आसाम मध्ये आढळतात,महाराष्ट्रात चांदोली अभयारण्यात त्याचे अस्तित्व जाणवले आहे, पण तो दिसलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्‍यातील माणगाव खोऱ्यात काही वर्ष पूर्वी काळा बिबट्या दिसला होता. आंबोली-चौकूळपर्यंत त्याचा वावर असल्याचे आढळले आहे. जुन्या नोंदींनुसार, आंबोली-महादेवगड परिसरात १६ मार्च १९३३ रोजी काळ्या बिबट्याचीशिकार झाली होती. त्यानंतर आता विदर्भातील ताडोबाच्या घनदाट जंगलात या काळ्या बिबट्याची अधिकृत नोंद झाली आहे.
आज परियंत "जंगलबुक' मालिकेच्या माध्यमातून बघिरा या नावाने काळ्या बिबट्याची ओळख होती मात्र मंगळवारी ताडोबात या काळ्या रंगाच्या बिबट्याने दर्शन दिल्यानंतर आता ताडोबात देखील एक बघिरा असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारामुळे गेल्या काही वर्षांत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. वनविभाग आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळांच्या प्रयत्नांमुळे ताडोबाकडे पर्यटकांचा कायम ओढा असतो. असे असतांना देखील ताडोबात आढळलेला हा काळ्या रंगाचा बिबट आणखी ताडोबात पर्यटकांची गर्दी खेचून आणेल हे मात्र नक्की ....



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.