Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २७, २०१८

चंद्रपुरात महसूल कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

चिमूर (जि. चंद्रपूर):
वाळूतस्करीत जप्त केलेले ट्रॅक्‍टर घेऊन येताना वाळूतस्कराने महसूल कर्मचारी आणि ट्रॅक्‍टरवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नायब तहसीलदार वेळेत पोहोचल्याने अनर्थ टळला. ही घटना येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास घडली.महसूल कर्मचाऱ्यांना वाळूची अवैध तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. नायब तहसीलदार श्रीधर राजमाने, चालक दत्तात्रय देवराव कडपे यांनी गांधी चौक गाठले. वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्‍टर थांबविले. मात्र, ट्रॅक्‍टरचालक घटनास्थळावरून पळून गेला. महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून ट्रॅक्‍टर जप्तीची कारवाई केली. चालक देवराव कडपे जप्त केलेले ट्रॅक्‍टर तहसील कार्यालयात नेण्यासाठी निघाले. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाळूतस्कर मनोज खुशाल नागपुरे आणि त्याच्या एका सहकाऱ्याने ट्रॅक्‍टर अडविले. सोबत आणलेले पेट्रोल ट्रॅक्‍टर आणि चालक कडपे यांच्यावर ओतले आणि आगीची काडी फेकली. मात्र, तेवढ्यात नायब तहसीलदार राजमाने आणि इतर महसूल कर्मचारी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.
चालक दत्तात्रय कडपे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वाळूतस्कर मनोज नागपुरे आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्तलिहिस्तोवर वाळूतस्कराला अटक झाली नव्हती.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.